US Pneumonia Outbreak esakal
आरोग्य

US Pneumonia Outbreak : चीननंतर आता अमेरिकेतही गूढ न्यूमोनियाचे संकट, असंख्य मुले रूग्णालयात दाखल

चीनमध्ये धूमाकळू घालणारा हा गूढ न्यूमोनिया आजार आता अमेरिकेतही आढळून आला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

US Pneumonia Outbreak : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये धूमाकूळ घालणाऱ्या गूढ न्यूमोनियाने चिंता वाढवलेली असताना आता अमेरिकेत या आजाराने तोंड वर काढले आहे. अमेरिकेतील ओहियो राज्यातील असंख्य मुलांना गूढ न्यूमोनियाने ग्रासले आहे. या सर्व मुलांना रूग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चीनमध्ये या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. चीनमध्ये आढळून आलेला हा गूढ न्यूमोनिया आजार अमेरिकेतील ओहियो या केवळ एका राज्यात आढळून आला आहे.

या संदर्भात एबीपी न्यूजने वृत्त दिले असून, अमेरिकेतील वॉरन काउंटीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑगस्टपासून ते आतापर्यंत 142 बाल वैद्यकीय प्रकरणे आढळून आली आहेत. या आजाराला त्यांनी ‘व्हाईट लंग सिंड्रोम’ असे नाव दिले आहे.

वॉरन काउंटीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (29 नोव्हेंबरला) एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, व्हाईट लिंग सिंड्रोम हे ओहियो वैद्यकीय विभागासाठी एक मोठे चॅलेंज आहे. तसेच, ते म्हणाले की, हा आजार चीनमध्ये पसरलेल्या गूढ न्यूमोनियासारखाच आहे. त्यामुळे, आता चीननंतर अमेरिकेचे टेंन्शन वाढले आहे.

नेदरलॅंड आणि डेन्मार्कमध्ये न्यूमोनियाचे संकट

अमेरिकेनंतर आता नेदरलॅंड आणि डेन्मार्कमध्ये देखील या गूढ न्यूमोनियाचे संकट निर्माण झाले आहे. नेदरलॅंड आणि डेन्मार्कने देखील सांगितले की, त्यांच्या देशात देखील लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या गूढ न्यूमोनियासारखीच काही प्रकरणे आढळून आली आहेत.

कोरोना या महामारीच्या दरम्यान लॉकडाऊन, मास्क सक्ती आणि शाळा बंद ठेवल्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे काही अभ्यासांमधून समोर आले आहे.

ज्यामुळे, लहान मुले हंगामी संसर्गाप्रती अधिक संवेदनशील झाली आहेत. या आजाराला रोखण्यासाठी लहान मुलांनी त्यांचे हात धुणे, खोकताना रूमालाचा वापर करणे आणि आजारी असल्यावर घरीच आराम करणे आणि लसींबाबत अपडेट राहण्याचा सल्ला वॉरन काउंटीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या आजारासंदर्भात वॉरन काउंटीच्या डॉक्टरांनी सांगितलेली लक्षणे खालीलप्रमाणे :

  • ताप येणे

  • खोकला येणे

  • थकवा येणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT