Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (१२ जून २०२२ ते १८ जून २०२२)

गायत्री आणि सावित्री या महाशक्ती मानवी जीवनाच्या अव्यभिचारी भक्तीच्या अंतरंगातील मोठे भावस्पंदनच म्हणावे लागतील. संसार हाच मुळी एक वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष अनंतकोटी ब्रह्मांडनायकाचाच आहे.

श्रीराम भट saptrang@esakal.com

दैवी चमत्कार घडतील

मेष : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उलगडत जाणारा सप्ताह. सप्ताहात काही दैवी चमत्कार घडतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वटपौर्णिमा साधनेचं फळ देणारी! भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ प्रिय व्यक्तींच्या सुवार्ता. ता. १७ ची संकष्टी राजकारणी व्यक्तींना सुखद धक्का देणारी.

व्यावसायिक घबाड मिळेल

वृषभ : पौर्णिमेजवळ ग्रहांचं एक विशिष्ट फिल्ड राहील. अवचित गाठीभेटींतून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी वा विवाह इत्यादींतून चमत्कार दाखवणारी. ता. १७ व १८ हे दिवस शुभ ग्रहांच्या करामतींचेच. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं व्यावसायिक घबाड मिळेल.

सरकारी पातळीवरची कामं होतील

मिथुन : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाची फळं देईल. उगाच स्वप्नं पाहू नका, वास्तवात जगा. ता. १६ ते १८ हे दिवस प्रत्येक कामात ग्रीन सिग्नल देणारे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची सरकारी कामं होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत परिस्थितिजन्य लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग.

नोकरीत अनपेक्षित बढती

कर्क : पौर्णिमेच्या चंद्रबळात मोठे चौकार-षटकार ठोकणार आहात. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. राजकीय व्यक्तींना घबाडयोग. नोकरीत अनपेक्षित बढती मिळेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ व १७ हे दिवस जीवनातील एखादं शल्य घालवणारे.

तरुणांचे भाग्योदय होतील

सिंह : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात एक वेगळीच ऊर्जा मिळेल. घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे दैवी चमत्कार थक्क करतील. एखादा नवस पूर्ण कराल. ता. १५ व १६ हे दिवस पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती गाजवतील. मघा नक्षत्रास लॉटरी.

अचानक धनलाभ, कर्जवसुली होईल

कन्या : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचंच. कोणीतीही प्रलोभनं टाळा. बाकी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा नोकरीत भाग्योदयाची. ता. १७ ची संकष्टी उत्तरा नक्षत्रास दैवी चमत्काराची. चित्रा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट अचानक धनलाभाचा. कर्जवसुली होईल.

वैवाहिक जीवनात आनंदोत्सव

तूळ : सप्तमस्थ शुक्रभ्रमण पौर्णिमेच्या चंद्रबळात मोठी बहारीची फळं देईल. तरुणांचे मोठे भाग्योदय. नोकरीत पगारवाढीची चाहूल. एखादा नैतिक विजय मिळवाल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या शुभ संकेतांचा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र वैवाहिक जीवनात आनंदोत्सवाचं. चैनीवर खर्च.

सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल

वृश्‍चिक : पौर्णिमेची शक्तिस्पंदनं खेचूनच घ्याल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी साक्षात्कार होतील. वाचासिद्धी येईल. ता. १३ ते १५ हे दिवस विलक्षणच राहतील. अनुराधा व्यक्तींची सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल. ता. १७ ची संकष्टी गाठीभेटी, मुलाखती आणि करारमदार इत्यादींतून मोठी भाग्यबीजं पेरेल.

हितशत्रूंवर मात कराल

धनू : पौर्णिमेचं उधाण शुभ ग्रहांची स्पंदनं खेचून घेईल. तरुणांनो, लाभ घ्याच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ते १८ हे दिवस प्रत्येक वन-डे जिंकून देणारे. हितशत्रूंवर मात कराल. मूळ नक्षत्राचा नोकरीत भाग्योदय. ता. १६ ची संकष्टी अद्वितीय स्वरूपाची फळं देईल.

डावपेच यशस्वी होतील

मकर : पौर्णिमेचं एक सुंदर पॅकेज राहील. फक्त आजच्या रविवारी वाहनं सांभाळा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती ता. १४ च्या पौर्णिमेची शक्तिस्पंदनं अक्षरशः खेचून घेतील. विशिष्ट डावपेच यशस्वी होतील. ता. १६ व १७ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठे दैवी चमत्कार दाखवतील. एखादं हृदयशल्य निघून जाईल. कलाकारांचे भाग्योदय.

उत्तम संकेत मिळतील

कुंभ : वक्री शनीची आचारसंहिता पाळाच. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात घरी वा दारी दादागिरी नको. बाकी तरुणांना पौर्णिमा शुभ ग्रहांच्या संगतीतून शिक्षण, नोकरी वा विवाह या त्रिघटकांतून उत्तम संकेत देणारी. ता. १४ ते १६ हे दिवस पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम बॅटिंगचेच राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार देवदर्शनाचा.

व्यावसायिक मुहूर्तमेढ होईल

मीन : ता. १४ च्या वटपौर्णिमेची शक्तिस्पंदनं पूर्णपणे खेचून घेणार आहात. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय लाभसंपन्न होतील. काही क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवले जातील. व्यावसायिक मुहूर्तमेढ होईल. ता. १६ ते १८ हे दिवस पूर्णपणे शुभ ग्रहांच्या षटकांचे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा शेअर चांगलाच वधारणार आहे. वास्तुविषयक व्यवहार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT