weekly horoscope 15th october 2023 to 21st october 2023 esakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (१५ ऑक्टोबर २०२३ ते २१ ऑक्टोबर २०२३)

माणूस हा सत् चित् आणि आनंद यांच्या परस्पर संबंधातून उद्‍भवलेला एक अलौकिक स्पंदच म्हणावा लागेल.

श्रीराम भट

मौल्यवान बाबींची खरेदी कराल

मेष : नवरात्रोत्सव निश्चितपणे ऊर्जा देणारा सत्संग ठेवा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ व १६ हे दिवस घरात मंगलमयीच. विशिष्ट मौल्यवान खरेदी कराल. वास्तूविषयक हालचाली. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ हे दिवस मोठे दैवी चमत्काराचे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आध्यात्मिक प्रचिती येईल.

कलाकारांना उत्तम कालखंड

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी या सप्ताहात भाजण्या-कापण्यापासून सावध. वाहने सांभाळा. बाकी ता. १७ व १८ हे दिवस कलाकारांना छानच. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे दिवस घरगुती उत्तम सोहळ्याचे. वैवाहिक जीवन फुलेल. उंची वस्तूंची खरेदी होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार भाग्योदयाचा.

जीवनाचा सूर गवसेल

मिथुन : सप्ताहात भावनात्मक एका कोषात राहाल. घरात देवदेवतांचा अदृश्य वास राहीलच. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना साक्षात्कार होईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र भ्रमणाचा स्पंद बौद्धिक उपक्रमातून कनेक्टिव्हिटी देईल. अर्थातच जीवनाचा सूर गवसेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सखीचा सहवास लाभेल.

नोकरीत गैरसमज टाळा

कर्क : सप्ताहात मंगळ भ्रमणातून थोडा उच्चदाब राहील. विद्युत उपकरणे जपा. घरातील व्रात्य लहान मुले जपा. बाकी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना नवरात्रोत्सव मंगलमयीच राहील. विशिष्ट शुभारंभ होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत गैरसमज टाळावेत. बाकी आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस व्यावसायिक धनलाभांचे.

सरकारी माध्यमातून लाभ शक्य

सिंह : नवरात्रोत्सव एका पर्वणीसारखाच! तरुणांनो लाभ घ्याच. एखादे स्पर्धात्मक यश जीवन सार्थकी लावेल. नोकरीत भाग्योदय. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना लॉटरीची शक्यता. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा मार्केटमधील शेअर चांगलाच वधारेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमातून लाभ.

उष्णताजन्य विकारांपासून जपावे

कन्या : चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नवरात्रोत्सव वैयक्तिक छंद वा उपक्रमांतून उत्तम साथ देईल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट नोकरी-व्यावसायिक घडामोडीतून उत्तमच. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटने घडतील. मात्र उष्णताजन्य विकारांपासून जपावे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नोकरीत शुभलक्षणी.

विजयी चौकार-षटकार माराल

तूळ : भावनात्मक ग्रहांचे उत्तम संधान राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना एक प्रकारच्या भावनिक कोषात ठेवेल. पती वा पत्नीचा भाग्योदय नवरात्रोत्सव साजरा करेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे दिवस विजयी चौकार-षटकारांचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात जपावं.

उत्सव-प्रदर्शनातून लाभ

वृश्चिक : सप्ताह आरोग्यविषयक बाबींतून जपण्याचाच. बाकी सप्ताहात शुक्र भ्रमणाचा स्पंद नोकरी व्यावसायिक पर्यावरण छानच ठेवेल. ता. १८ ते २० हे दिवस अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम साथसंगतीचे. नोकरीत प्रशंसा होईल. व्यावसायिक उत्सव प्रदर्शनातून लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ नोकरी देणारा.

वातावरण प्रसन्न राहील

धनू : नवरात्रात आपला शेअर चांगलाच वधारणार आहे. सप्ताहात भावनात्मक ग्रहांचे अर्थातच बुध, शुक्र आणि गुरू यांचे स्पंद आजूबाजूचे पर्यावरण अतिशय शुद्ध आणि प्रसन्न ठेवतील. मूळ नक्षत्र व्यक्तींचा विरोधी सूर मावळेल. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताहाचा आरंभ आणि शेवट कृतकृत्य करणारा.

राजकीय दहशतीचा त्रास शक्य

मकर : सप्ताहारंभ सुवार्तांच्या जोषात साजरा कराल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात छंद उपक्रमातून झगमगाट होईल. विशिष्ट बाबतीत पुत्रचिंता जाईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार घरात मोठा मंगलमयी राहील. पती वा पत्नीची चिंता जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नवरात्रात राजकीय दहशतीतून त्रास होऊ शकतो.

नोकरीची संधी मिळेल

कुंभ : नवरात्रात शुक्रभ्रमणाचा स्पंद उत्तम व्यापून राहील. आजूबाजूचे मानसिक पर्यावरण उत्तम राहील. घरात देवदेवतांचा अनुभव येईल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट छानच छान. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी गुणसंपदेचा लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार शैक्षणिक भाग्योदयाचा. नोकरी मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पित्तप्रकोपाचा त्रास शक्य.

मानसिक त्रासाची शक्यता

मीन : सप्ताहात मंगळ भ्रमणाचा विचित्र प्रभाव राहू शकतो. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी भावनिक प्रस्फोट टाळावा. खरेदी-विक्रीत सांभाळावे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र वैचारिक गोंधळातून त्रास होऊ शकतो. बाकी सप्ताहाचा शेवट घरात हृद्यच राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत भाग्योदय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT