weekly horoscope 17th september 2023 to 23rd september 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (१७ सप्टेंबर २०२३ ते २३ सप्टेंबर २०२३)

सर्व कार्यारंभी ‘श्रीगणेशाय नमः’ असं वंदन करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीनं घालून दिली आहे.

श्रीराम भट

उत्तम नोकरी मिळेल

मेष : सप्ताहात मंगळभ्रमण शारीरिक वेदनायुक्त व्याधींतून बोलू शकते. दुखापती सांभाळा. बाकी, सप्ताहातील श्रीगणेशांचं आगमन वैवाहिक जीवनात शुभघटनांचं. भरणी नक्षत्रास भागीदारीतून लाभ. अश्‍विनी नक्षत्राच्या तरुणांना छान नोकरी मिळेल. कृत्तिका नक्षत्राचा सन्मान.

गाठीभेटी यशस्वी होतील

वृषभ : या सप्ताहात अन्नपाण्यातील संसर्गापासून जपावं. बाकी, रोहिणी नक्षत्रास ता. २१ व २२ हे दिवस अतिशय प्रसन्न राहतील. प्रवासातील कामं होतील. मृग नक्षत्रास सप्ताहाचा शेवट गाठीभेटी यशस्वी करणारा. विशिष्ट वाद मिटतील. कृत्तिका व्यक्तींना छंदांतून-उपक्रमांतून यश-प्रसिद्धी.

मनासारख्या घटना घडतील

मिथुन : श्रीगणेशोत्सवाचा सप्ताह शुभग्रहांची कनेक्टिव्हिटी ठेवेलच. मनासारख्या घटना घडतील. ता. १८ ते २० हे दिवस चढत्या क्रमानं शुभ राहतील. पुनर्वसू नक्षत्रास मोठे व्यावसायिक लाभ. आर्द्रा नक्षत्रास राजकीय व्यक्तींकडून लाभ. मात्र, सप्ताहाच्या शेवटी वाहनं जपून चालवा.

व्यवसायात बरकत

कर्क : सप्ताहातील श्रीगणेशोत्सव एकूणच व्यावसायिक बरकतीचाच. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात येतील. श्रीगणेशांचं आगमन मोठ्या भाग्यसंकेतांचं. पुत्रचिंता दूर होईल. पुष्य नक्षत्रास ता. २१ ते २३ हे दिवस व्यावसायिक वसुलीचे. पुनर्वसू नक्षत्रास परदेशगमन किंवा तीर्थाटन घडेल.

आर्थिक व्यवहार जपून करा

सिंह : हा सप्ताह तरुणांना उत्तमच राहील. राशीतील बुधाची स्थिती सप्ताहाच्या शेवटी जीवनात मोठ्या संधी देणारी. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. पूर्वा नक्षत्रास व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनातून लाभ. मघा नक्षत्रास सप्ताहारंभ आर्थिक व्यवहारांतून फसगतीचा ठरू शकतो. उधार-उसनवारी नकोच. उत्तरा नक्षत्रास कलात्मक बाबींतून यश प्रसिद्धी.

व्यवसायात तेजी येईल

कन्या : सप्ताहात राशीच्या मंगळाचा विचित्र प्रभाव राहीलच. नोकरीत हितशत्रुंकडून त्रास होईल. उत्तरा नक्षत्राने गैरसमज टाळावेत. वैवाहिक जीवनात त्रास संभवतो. हस्त नक्षत्रास श्रीगणेशांचं आगमन घरात आनंदोत्सवाचं. घरातील तरुणाचा भाग्योदय. व्यावसायिक तेजी जाणवेल. चित्रा नक्षत्रास ता. २१ व २२ हे दिवस छंदांतून, उपक्रमांतून प्रसिद्धीचे.

जुन्या गुंतवणुकी यशस्वी होतील

तूळ : यंदाचा गणेशोत्सव अतिशय मंगलमय राहील. घरात मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी राहील. स्वाती नक्षत्रास मोठे अर्थलाभ. जुन्या गुंतवणुकी यशस्वी होतील. सप्ताहाचा शेवट विशाखा नक्षत्रास वैयक्तिक छंदांतून वा उपक्रमांतून झगमगाटाचा. चित्रा नक्षत्रानं थट्टामस्करी टाळावी.

नोकरीतून परदेशगमन घडेल

वृश्‍चिक : हा सप्ताह कलाकारांना प्रकाशात आणणारा. ज्येष्ठा नक्षत्रास ता. २० ते २२ हे दिवस विशिष्ट शुभारंभाचे. नवे व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील. नोकरीतून परदेशगमन घडेल. अनुराधा नक्षत्रास श्रीगणेशांचे आगमन विशिष्ट पतप्रतिष्ठा देईल. वैवाहिक जीवन फुलेल. अर्थातच नवपरिणितांचा भाग्योदय.

जीवनाचा सूर गवसेल!

धनू : आपली गुरूची रास श्रीगणेशोत्सवात दैवी कनेक्टिव्हिटी साधेल. जीवनात एक प्रकारचा सूर गवसेल. बुद्धिजीवी मंडळींना सप्ताह संस्मरणीयच. मूळ नक्षत्राचे शिक्षण, नोकरीचे प्रश्न मार्गी लागतील. श्रीगणेशांचं आगमन अतिशय संस्मरणीय राहील. उत्तराषाढा नक्षत्राचा सन्मान.

उधार-उसनवारी नको

मकर : हा सप्ताह शुक्रभ्रमणामुळे व्यावसायिक घडामोडींतून प्रसन्न ठेवेलच. मात्र, उधार-उसनवारी नको. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. श्रीगणेशोत्सवात श्रवण नक्षत्रास नोकरीत विशिष्ट लाभ होतील. ता. २१ व २२ हे दिवस जल्लोषाचे. उत्तराषाढा नक्षत्रास तीर्थाटन घडेल.

खरेदी-विक्रीत फसू नका

कुंभ : या सप्ताहात मंगळभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर इतर ग्रहयोग बोलतील. सप्ताहात खरेदी-विक्रीत फसू नका. गर्दीच्या ठिकाणी संसर्गापासून जपा. विद्युत-उपकरणं सांभाळा. बाकी, पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास एखादं शैक्षणिक यश चकित करेल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. धनिष्ठा नक्षत्रास आरोग्यविषयक गुप्त चिंता सतावेल.

संकटनिवारण होईल

मीन : सप्ताहातील ता. २० व २१ हे दिवस नक्षत्रलोकांतून फलदायी होणारे! उत्तराभाद्रपदा नक्षत्र त्याचा लाभ उठवेल. रेवती नक्षत्रास सप्ताहाचा शेवट संकटनिवारणाचा. विशिष्ट अपयश धुऊन काढाल. तरुणांचं नैराश्‍य जाईल. बाकी, सप्ताहात गावगुंडांपासून सावध राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna : मोठी बातमी ! प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

भाड्याच्या घरात सापडलेला रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; पत्नी- मुलासोबत का राहत नव्हते? हे होतं कारण

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT