कळवण: कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शंभर टक्के पदभरती न झाल्यास शाळांना कुलूप ठोका, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनात केले होते. त्यांच्या या इशाऱ्यानंतर कळवण तालुक्यातील पालक आणि शालेय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सात शासकीय आश्रमशाळांवर कुलूप लावून विद्यार्थ्यांना घरी नेले.