weekly horoscope 21st may 2023 to 27th may 2023
weekly horoscope 21st may 2023 to 27th may 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (२१ मे २०२३ ते २७ मे २०२३)

श्रीराम भट

नवकल्पनांना वाव मिळेल

मेष : तरुणवर्गास शुक्रभ्रमण आणि राशीचा गुरू नवकल्पनांना वाव देईल. ता. २३ ते २५ हे दिवस नोकरीच्या मुलाखती, विशिष्ट व्यावसायिक गाठीभेटी आणि वैयक्तिक उत्सव, प्रदर्शनं आदींमधून छान प्रतिसाद देतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. शनिवारी प्रसिद्धियोग.

थोरामोठ्यांच्या भेटीतून लाभ

वृषभ : आजचा रविवार व्यावसायिक उलाढालींचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून लाभ. ता. २३ मेचा मंगळवार धनचिंता घालवेल. ता. २५ मेचा गुरुपुष्यामृत योग कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची शैक्षणिक चिंता घालवेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह कला, छंद उपक्रमांतून प्रसिद्धियोगाचा.

वरिष्ठांशी वाद टाळा

मिथुन : अतिशय छान असा ग्रहांचा ट्रॅक आहे. सहज राहा. अर्थातच, उन्माद नको. सप्ताह नोकरीत कर्तृत्वाला उजाळा देणारा. सप्ताहाचा आरंभ अतिशय छानच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ व २३ हे दिवस भाग्यबीजं पेरतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस थट्टामस्करीतून घातक. वरिष्ठांशी वाद टाळा. शनिवार पर्यटनाचा ठरेल.

छान नोकरी मिळेल

कर्क : राशीचा मंगळ सप्ताहात संमिश्र स्वरूपाची फळं देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. ता. २५ मेचा गुरुपुष्यामृत नोकरीत भाग्योदयाचा. तरुणांना छान नोकरी मिळेल. शुक्रवारी स्त्रीशी वाद टाळा. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी शेजारीपाजारी जपून राहावं. कागदपत्रं सांभाळा.

परदेशातल्या व्यापारामध्ये यश

सिंह : भाग्यातील गुरूचा अंडरकरंट राहीलच. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचं मार्केटिंग यशस्वी होईल. अर्थातच शुक्रभ्रमणाची स्पंदनं खेचून घ्याल. सप्ताहाची सुरुवात ऑनलाइन चमत्कार करणारी. परदेशातल्या व्यापारात यश. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा आनंद पर्यवसायी. शुभ घटनांतून फ्लॅशन्यूज द्याल.

बॅंकेचं कर्ज मिळेल

कन्या : सप्ताह वास्तुविषयक व्यवहारांना गती देणारा. सरकारी माध्यमांतून सहकार्य मिळेल. चित्रा नक्षत्राचं मार्केटिंग यशस्वी होईल. ता. २३ ते २५ हे दिवस प्रचंड गतिमान राहतील. उद्याच्या सोमवारी आणि शेवटी शनिवारी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींच्या गुंतवणुकी यशस्वी होतील. बँकेचं कर्ज मिळेल. नोकरीत परिस्थितीचा लाभ.

कला व छंदांमधून प्रसिद्धीचा योग

तूळ : सप्ताहात ग्रहमानाचा ट्रॅक कौशल्यातून लाभ देणारा. बौद्धिक क्षेत्रातील मंडळींना सप्ताह उत्तमच. सप्ताहात तरुणवर्ग ध्येयाकडे निश्चितच झेपावेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचे कायदेशीर प्रश्न सुटतील. ता. २३ ते २५ हे दिवस मोठ्या सुवार्तांची साखळी ठेवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ कला वा छंद माध्यमातून प्रसिद्धियोगाचा. वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील.

व्यवसायातील मंदी जाईल

वृश्चिक : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांची मंदी घालवेल. काहींना सरकारी माध्यमातून लाभ होतील. विशिष्ट ओळखी, मध्यस्थी फलद्रूप होतील. आजचा रविवार भाग्यसूचक. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्ट प्रकरणातून यश. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ चा गुरुपुष्यामृत योग संकटविमोचनाचा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लॉटरी.

वास्तुविषयक प्रश्‍न सुटतील

धनू : शुक्रभ्रमणाची हरियाली राहील. तरुणांनो लाभ घ्याच. विवाह प्रस्तावांकडे लक्ष द्याच. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सर्वच बाबतीत मोठा प्रतिसाद देणारा. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती सुखसमाधानाचं पर्व सुरू करणारा सुंदर सप्ताह. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक प्रश्नातून सोडवणारा. विशिष्ट तडजोड होईल.

शुभ ग्रह तारून नेतील

मकर : सप्ताहात शुभ ग्रहांचे अंडरकरंट तारून नेतील. सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तमच साथ देईल. ता. २५ मेचा गुरुपुष्यामृत योग भाग्याचा. उत्तराषाढा नक्षत्रास पतप्रतिष्ठा देणारा. श्रवण नक्षत्रास ता. २३ ते २५ हे दिवस घरातील तरुणांचे प्रश्न सोडवतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचे विशिष्ट करारमदार होतील.

स्पर्धात्मक पातळीवर यश

कुंभ : सप्ताह बुद्धिचातुर्यातून लाभ देणाराच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. काहींना सरकारी माध्यमातून पाठबळ मिळेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ गाठीभेटी यशस्वी करणारा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळींकडून लाभ होतील. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. पुत्रचिंता जाईल.

आत्मविश्वास वाढवणारं यश मिळेल

मीन : सप्ताहातील शुक्रभ्रमण घरात चांदणं शिंपीत नेणारं आणि गुरुभ्रमण ता. २५ मेच्या गुरुपुष्यामृताचा मोका साधेल. अर्थातच विचित्र छायाग्रस्तता जाईल. तरुणांना विशिष्ट यश आत्मविश्वास वाढवेल. सप्ताहात रेवती नक्षत्राच्या व्यक्ती आपल्यातील कलागुण प्रदर्शित करतील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती एखादा नैतिक विजय संपादन करतील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT