कलाकार, खेळाडूंना पर्वणीचा काळ
मेष : राशीतील गुरूचं साम्राज्य आणि शनी-बुध युतियोगाचं फिल्ड अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या प्रकाशात आणणारं. कलाकार, खेळाडू आणि विद्यार्थिवर्गास ता. २८ ते ३० हे दिवस पर्वणीसारखे राहतील. प्रवासातील कामं होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार धडपडण्यापासून जपण्याचा.
नोकरीतली चिंता जाईल
वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण उत्तम विवाहस्थळं आणून देईल. नोकरीतील चिंता जाईल. विशिष्ट कायदेशीर कटकटी मिटतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ महत्त्वाच्या गाठीभेटींतून फलदायी होणारा. रोहिणी नक्षत्रास सप्ताहाच्या शेवटी सावर्जनिक बाबी व गोष्टींतून त्रास. राजकारणी मंडळींपासून सांभाळा.
आदर-सत्काराचे योग
मिथुन : राशीतील रवी-बुध युतियोगाचं फिल्ड गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर छान घोडदौड करेल. नोकरी, व्यावसायिक सुख-स्वास्थ्य वाढेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे आदर-सत्कार होतील. ता. २८ ते ३० हे दिवस आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पधार्त्मक बाबींमधून छानच. पुनर्वसू नक्षत्रांच्या व्यक्तींचं ‘खुल जा सिम सिम’ होईल. अर्थातच, एखादी लॉटरी लागेल.
सुवार्ता मिळतील, घरात कार्य ठरेल
कर्क : सप्ताहात पुष्य नक्षत्राचे वैयक्तिक उत्सव-समारंभ होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचे योग. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरीत हितशत्रूच्या पीडेतून त्रास देऊ शकतो, वरिष्ठांची मनं सांभाळा. उद्याचा सोमवार कटकटीचा. ता. २९ ची आषाढी एकादशी घरात सुवार्तांची. घरात कार्य ठरेल.
मोठ्या भाग्योदयाची चाहूल
सिंह : सप्ताहातील रवी-बुध युतियोगाचं फिल्ड तरुणांना उत्तमच राहील, विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सर्वोतोपरी साथ देणारं ग्रहमान. ता. २७ ते २९ हे दिवस स्वतंत्र व्यावसायिकांना मोठ्या भाग्योदयाची चाहूल देतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना कला, छंद, उपक्रमांतून मोठं साथ देणारं ग्रहमान. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी खरेदी-विक्रीतील प्रलोभनं सांभाळावीत.
पोटाच्या व्याधी सतावतील
कन्या : सप्ताह भाजण्या-कापण्याच्या दुर्घटना घडवू शकतो. उद्याचा सोमवार अतिरेकी मंडळींना घातक. बाकी रवी-बुध युतियोगाचं फिल्ड उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत भाग्योदयाचं, वरिष्ठांचा अनुग्रह. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात पोटाच्या व्याधी सतावतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मित्रांच्या कुरापतीतून त्रास.
प्रवासात काळजी घ्या
तूळ : रवी-बुध योगाचं फिल्ड आपणास फुल चार्ज्ड ठेवेल, होतकरू तरुणांना मोठे लाभ होतील. ता. २७ ते ३० हे दिवस सुवार्तांतून फ्लॅश न्यूजमध्येच आणणारे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होतील, परदेशी व्हिसा मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी, मध्यस्थीतून विलक्षण लाभ होतील. मात्र, उद्याचा सोमवार प्रवासात जपा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय हितशत्रूंची पीडा.
गुप्त चिंता संपतील
वृश्चिक : सप्ताहात घरातील वादविवाद सांभाळा. बाकी सप्ताह तरुणांना कला, छंद, उपक्रमांतून छानच प्रतिसाद देईल. मात्र, सप्ताहात अन्न-पाण्यातून होणाऱ्या संसर्गापासून जपा. ता. २७ व २८ हे दिवस अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्तचिंतेतून बाहेर काढणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट एखादा नैतिक विजय संपादन करून देईल.
आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
धनू : सप्ताहातील एक बहारदार फळं अनुभवणारी रास राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचं पूर्वसुकृत फळास येईल. तपपूर्तीचा सोहळा साजरा कराल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सुखनिद्रा देईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात आर्थिक जुगार टाळावाच. देण्या-घेण्याच्या व्यवहारात फसू नये.
व्यवसायातील संकट जाईल
मकर : मंगळ-हर्षल योगाचं एक विचित्र फिल्ड राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणताही अट्टाहास टाळावा, स्त्रीवर्गाशी हुज्जती नकोत. बाकी सप्ताह घरातील मुलाबाळांचे प्रश्न सोडवेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ हे दिवस मोठ्या दैवी प्रचितीचे. व्यावसायिक संकट जाईल. कोर्ट प्रकरणातून मुक्तता. शनिवारी घरात मौन पाळा.
मोठ्या शैक्षणिक संधी येतील
कुंभ : सप्ताहात रवी-बुध युतियोगाचं फिल्ड मोठी मजेदार फळं देईल. तरुणांनी ता. २८ ते ३० या दिवसांत येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. सुयोग्य विवाहस्थळांकडे लक्ष द्या. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या शैक्षणिक संधी येतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक धनचिंता घालवणारी आषाढी एकादशी. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी उद्याच्या सोमवारी दुखापतीपासून जपावं.
धनलाभाची परंपरा राहील
मीन : सप्ताहातील मानसिक पर्यावरण छानच राहील. सप्ताहात घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अकल्पित लाभ होतील. आजचा रविवार व्यावसायिक भाग्योदयाचा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट धनलाभांची परंपरा ठेवेल. रेवती नक्षत्राच्या पती वा पत्नीचा भाग्योदय आनंदोत्सव साजरा करणारा असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.