Weekly Horoscope
Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (३ एप्रिल २०२२ ते ९ एप्रिल २०२२)

श्रीराम भट saptrang@esakal.com

सरकारी कामांमध्ये यश

मेष : सप्ताह ग्रहांच्या सत्तासंघर्षाचा अर्थातच राजकारणी व्यक्तींना खराब. वृद्धांनी दुखापती जपाव्यात. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी भावाबहिणींची मनं सांभाळावी. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश. ओळखी-मध्यस्थींतून लाभ. सप्ताहाचा शेवट मानसन्मानाचा. पुत्रोत्कर्ष होईल.

नोकरीत लाभ होतील

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी शत्रुपीडा सांभाळावी. बाकी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत परिस्थितीजन्य लाभ. ता. ६ व ७ हे दिवस अतिशय प्रवाही. मुलाखतींतून यश. सप्ताहात घरातील वृद्धांची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान.

शुभ ग्रहांच्या साथसंगतीचे दिवस

मिथुन : शनी-मंगळ युतियोगाचा प्रभाव राहीलच. नैसर्गिक पाठबळ मिळणार नाही. जुनाट व्याधी सांभाळा. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ आणि ८ हे दिवस शुभ ग्रहांच्या मोठ्या साथसंगतीचे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव प्रसंगातून लाभ. मात्र गावगुंडांपासून सांभाळा. उधार-उसनवारी नको.

छान व्यावसायिक प्राप्तीचा कालखंड

कर्क : ग्रहांचं फिल्ड आपणास धावबाद करू शकतं. तरुणांनो नका करू कोणाशी स्पर्धा. नवपरिणितांनी आपलं भावविश्‍व जपावं. अहंकार सांभाळा. सामाजिक उठाठेवी नकोतच. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी वरील आचारसंहिता पाळावी. बाकी ता. ६ व ७ हे दिवस छान व्यावसायिक प्राप्तीचे. पुष्य नक्षत्रास बदलीतून त्रास.

नोकरी, प्रेम प्रकरणात प्रगती होईल

सिंह : सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नैसर्गिक पाठबळ राहणार नाही. उत्सव-समारंभातून बेरंग. ता. ३ ते ५ हे दिवस ग्रहांच्या उच्च दाबाचे. बाकी ता. ७ ते ९ हे दिवस शुभ ग्रहांच्या जबरदस्त कनेक्‍टिव्हिटीचे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती प्रचंड लाभ उठवतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी, प्रेम प्रकरणात प्रगती.

कोर्टविषयक कामांतून यश

कन्या : सप्ताह स्त्रीवर्गास खराब. घरात लहान मुलांचे त्रास. सार्वजनिक जीवनात गैरसमज टाळा. शेजाऱ्यांशी वाद नकोत. सप्ताहाची सुरुवात विचित्र खर्चाची. बाकी ता. ६ व ७ हे दिवस हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना मुलाखती, विशिष्ट करारमदार व कोर्टविषयक कामांतून यश देणारे. उत्तरा नक्षत्रास त्वचाविकार सतावतील.

राजकीय फायदा व सन्मान होईल

तूळ : सप्ताह ग्रहयोगांतून उच्च दाबाचाच. सप्ताह अनेक प्रकारांतून अपघातानुकूल. सप्ताहाची सुरुवात विचित्र गाठीभेटीची. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मानवी प्रदूषणातून त्रास. बाकी ता. ७ ते ९ हे दिवस शुभ ग्रहांच्या लॉबीचे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. शनिवार सन्मानाचा.

तरुणांना नोकरीत यश

वृश्‍चिक : सप्ताहात आपले विशिष्ट डावपेच यशस्वी होतील. शत्रूवर दहशत बसेल. बाकी सप्ताहात हातापायाच्या दुखापती जपा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी शारीरिक मस्ती टाळावी. बाकी ता. ६ व ७ हे दिवस अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना जनसंपर्कातून छानच. तरुणांना मुलाखतींतून यश.

नोकरीत स्थान बळकट होईल

धनू : सप्ताह उपद्‌व्यापी व्यक्तींना त्रास देऊ शकतो. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी उधार-उसनवारीतून सांभाळावं. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीतील आसन बळकट होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ ते ९ हे दिवस जीवनात निश्‍चितच वसंत फुलवतील. पती वा पत्नीच्या सुवार्ता धन्य करतील. व्यावसायिक मोठे शुभारंभ.

येणी येतील, महत्त्वाची कामं होतील

मकर : राशीतील शनी-मंगळाच्या सत्तासंघर्षाच्या झळा सप्ताहात जाणवतील. वादग्रस्त मंडळींना सप्ताह किचकटच! धनिष्ठा व्यक्तींना जास्त झळा पोचू शकतात. ता. ३ ते ५ हे दिवस हाय व्होल्टेजचे. श्रवण नक्षत्रास ता. ६ व ७ हे दिवस मोठे सुसंगत. महत्त्वाची कामं. वादग्रस्त येणी येतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी लाभेल.

थोरामोठ्यांचा अनुग्रह होईल

कुंभ : सप्ताहात कोणतेही शॉर्टकट नकोत. संशयास्पद व्यवहार नकोत. बाकी राशीचं शुक्रभ्रमण आणि शुभ ग्रहांची लॉबी गुप्तपणे रसद पुरवत राहील. ता. ७ ते ९ हे दिवस शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे प्रेरक राहतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ चा शनिवार मोठ्या चमत्कारांचा. थोरामोठ्यांचा अनुग्रह होईल.

गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार टाळा

मीन : सप्ताहात जुगार टाळा. गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार नकोत. बाकी स्वतंत्र व्यावसायिकांना ता. ७ ते ९ हे दिवस निर्धोक राहतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीतील संकट जाईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट राजकीय व्यक्तींकडून लाभ होईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी तीर्थाटन घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT