Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (७ ऑगस्ट २०२२ ते १३ ऑगस्ट २०२२)

शत्रू-मित्रता आणि त्यातून उद्‌भवणारं राग, द्वेष, प्रीती हे त्रांगडं म्हणजेच माणसाचं जीवन असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही! अशा या मानवी शत्रू-मित्रत्वाचा अभ्यास करणारे ज्योतिषी ग्रहांची शत्रू-मित्रता चांगलीच ओळखत!

श्रीराम भट saptrang@esakal.com

कलागुणांतून प्रसिद्धीचा योग

मेष : चतुर्थातील शुक्रभ्रमणाची स्पंदनं खेचून घ्याल. ता. ९ व १० हे दिवस अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक सुवार्तांचे, कलागुणांतून प्रसिद्धी योग. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ व १२ हे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र नोकरीत कटकटीचं, काहींना राजकारणातून त्रास. शनिवारी चोरीची शक्यता, सांभाळा.

नवं मित्रमंडळ मिळेल

वृषभ : सप्ताहात शुभग्रहांची साथ राहीलच. शुक्रभ्रमणाचा नवा अध्याय तरुणांची उमेद वाढवेल. नवं मित्रमंडळ मिळेल, काहींचं प्रेम प्रकरण रंगेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० चा बुधवार कौतुक सोहळ्याचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र प्रिय व्यक्तींच्या उत्कर्षाचं; मात्र प्रवासात आणि वाहनापासून जपाच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक उपद्रव.

नोकरीत प्रसन्नता राहील

मिथुन : पौर्णिमेच्या सप्ताहात विचित्र गाठीभेटींतून त्रास. बाकी नोकरीत पौर्णिमेचा सप्ताह प्रसन्न ठेवणारा. ता. ९ ते १० हे दिवस एकूणच छान. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. नोकरीच्या मुलाखती गाजवाल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा गुप्तचिंतेतून हैराण करेल.

वैयक्तिक विक्रम कराल

कर्क : शनी-मंगळ आणि रवी-हर्षल यांचे योग पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उच्च दाबाचे आवर्त निर्माण करतील, विस्तवाशी खेळ नकोच. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळावं. बाकी सप्ताहात शुक्रभ्रमणाचा एक छान अध्याय सुरू होत आहे. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती लाभ उठवतील. शैक्षणिक भाग्योदय. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ हे दिवस वैयक्तिक विक्रम प्रस्थापित करतील.

तरुणांचं नैराश्‍य जाईल

सिंह : सप्ताह पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र बाधित करणारा. ग्रहांच्या केंद्रयोगांची विचित्र पार्श्‍वभूमी राहील. नैसर्गिक पाठबळ राहणार नाही. महत्त्वाच्या कामांच्या वेळा सांभाळा. आजूबाजूला दुर्घटना घडू शकतात. बाकी ता. ९ व १० ऑगस्ट हे दिवस पूर्वा नक्षत्राच्या तरुणांना नैराश्‍यातून बाहेर काढतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या संधी येतील.

थोरामोठ्यांकडून लाभ होतील

कन्या : पौर्णिमेच्या सप्ताहात शुभग्रहांचं ऊर्जास्रोत राहील. हस्त नक्षत्रास थोरामोठ्यांकडून लाभ. ता. ९ व १० हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती धनसंपन्न होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात प्रवासात विसरभोळेपणा सांभाळावा. प्रवासात लहान मूल सांभाळा.

व्यावसायिक लाभ, कुसंगत टाळा

तूळ : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात ग्रहांचे मोठे केंद्रयोग होत आहेत. भावनोद्रेक टाळा. बाकी पौर्णिमेच्या सप्ताहात शुक्रभ्रमणाचा छान अंडरकरंट राहील. ता. ८ ते १० हे दिवस तरुणांना अतिशय सुसंगत. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात कुसंगत टाळावी.

शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्णत्वास

वृश्‍चिक : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुभग्रहांची लॉबी प्रभावी राहीलच. एकूणच तरुणांना प्रेरक असं ग्रहमान. मात्र, सहवासातील द्वाड मित्र सांभाळा. काहींची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. ता. ८ ते १० हे दिवस विशाखा आणि अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी वैयक्तिक उत्सव, समारंभातून नेणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा भाजण्या-कापण्याची.

सरकारी कामं मार्गी लागतील

धनू : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात ग्रहांच्या केंद्रयोगांचा धुरळा राहील. आजूबाजूचं अवधान ठेवा. प्रवासात जपाच. पौर्णिमेजवळ वृद्धांनी सांभाळावं. पूर्वाषाढा व्यक्तींना ता. ८ ते १० हे दिवस महत्त्वाच्या गाठीभेटींचे, सरकारी कामं होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची वसुली होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा उत्सव, समारंभातून बेरंगाची वा चोरीची.

शुक्रभ्रमण आणि गुरुकृपेची रसद

मकर : सप्ताह परस्परविरोधी ग्रहमानाचाच. पौर्णिमेच्या चंद्रबळाचा काहींना लाभ होईलच; परंतु अहंकारी आणि राजकारणी व्यक्तींना ग्रहांच्या शह-काटशहातून चांगलाच उपद्रव होऊ शकतो, तरी सावधानता बाळगा! बाकी शुक्रभ्रमणाचा नवा अध्याय आणि गुरुकृपेची गुप्त रसद श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना श्रावणी पौर्णिमेजवळ छान प्रचिती देईल.

धनचिंता दूर होईल

कुंभ : चतुर्थातील मंगळाचं आगमन पौर्णिमेजवळ दखलपात्र. नवपरिणितांनी आचारसंहिता सांभाळावी. बाकी शनी-मंगळाचा केंद्रयोग अंगमस्तीतून धावबाद करू शकतो. वृद्धांनी आव आणू नये! बाकी ता. ९ ते ११ हे दिवस शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट संकटनिवारण करणारे. धनचिंता जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची थोरामोठ्यांकडून कामं होतील.

वादग्रस्त गाठीभेटी टाळा

मीन : पौर्णिमेचं चंद्रबळ अफलातून राहील. देवदेवतांचं आपल्यावर लक्ष राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनी-मंगळाचा केंद्रयोग शत्रुत्वाच्या झळा पोहोचवू शकतो. वादग्रस्त गाठीभेटी टाळाच. बाकी सप्ताहात गुरू-शुक्राची संगती मोठी उपकारक राहील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातील शुक्रभ्रमण घरात मोठं भावोत्कट राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna : मोठी बातमी ! प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

भाड्याच्या घरात सापडलेला रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; पत्नी- मुलासोबत का राहत नव्हते? हे होतं कारण

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT