Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (२८ नोव्हेंबर २०२१ ते ४ डिसेंबर २०२१)

माणसाच्या जीवनात ग्रहणं ही होतच असतात किंवा माणसाला ग्रहणं ही ग्रासतच असतात. माणसाचा संसार म्हणजे एक छाया प्रकाशाचा खेळच आहे.

श्रीराम भट saptrang@esakal.com

संशयाच्या कोरोनाचं ग्रहण कायमचं घालवू या !

माणसाच्या जीवनात ग्रहणं ही होतच असतात किंवा माणसाला ग्रहणं ही ग्रासतच असतात. माणसाचा संसार म्हणजे एक छाया प्रकाशाचा खेळच आहे. माणसाला विशिष्ट माणसांचा सहवास घडत असतो किंवा माणसं विशिष्ट माणसांच्या छायेत वाढत असतात. माता, पिता आणि गुरू यांच्या छायेत वाढणं हे भाग्याचेच लक्षण होय ! माता, पिता आणि गुरू या त्रयमूर्तीची छाया म्हणजे ग्रहणं नव्हे ! वरील त्रयमूर्तीचे स्मरण, त्यांचा सहवास किंवा त्यांची सावली माणसाच्या जीवनाला एक वेगळंच बाळसं देत असते.

सध्याचे कलियुग मोठे संशयग्रस्त होत आहे किंबहुना संशयाचे हे महाभयंकर असे हे ग्रहण मोठे प्रमाद घडवत आहे. आपल्या राशिचक्राचे आध्यात्मिक तत्त्व मोठे गूढ आहे. मेष ते वृश्‍चिक या राशी संसारातील उलाढालींशी संबंधित आहेत. राशिचक्रातील धनू ते मीन या गुरू-शनींच्या राशीवरील राशींच्या उलाढालीचे भोक्तृत्वच आहे असे आम्ही मानतो. गुरू आणि शनी यांची भ्रमणं एकमेकांना साथ देत माणसाला जीवनात सावरून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आपल्या ग्रहमालेची नैसर्गिक घटना गुरू आणि शनी यांच्या आधिपत्याखाली निसर्गतःच काम बजावत असते. गुरू आणि शनी यांच्या छाया म्हणा किंवा कृपाछत्र म्हणा, यांना ग्रहण म्हणणं म्हणजे मोठा घटनाद्रोह आहे! माता जशी आपल्या बालकाला आहे त्या परिस्थितीत उत्तम सांभाळत असते, तसेच गुरू आणि शनी हे ग्रह मातापित्यांचीच भूमिका निभावत आपली परिस्थिती निभावून नेत असतात. त्यामुळेच आई-वडील जिवंत असताना साडेसातीचा त्रास होत नाही!

मित्रहो, सध्या गुरू कुंभ राशीत आहे. तो ता. १३-०४-२०२१ पर्यंत कुंभेत राहील. नंतर तो मीनेत प्रवेश करेल. पुढे शनीचे भ्रमणसुद्धा कुंभ आणि मीन राशींतून होणार आहे असे हे मायबाप असलेले गुरू-शनी आपणास बोधामृत पाजून आपल्या जीवनाला लागलेली अज्ञानाची किंवा संशयाची ग्रहणं आगामी काळात कायमची घालवून देणार आहेत आणि आपली ज्ञानप्रकाशात वाटचाल होऊ लागेल! त्यामुळेच श्रद्धा ठेवा!

तरुणांचे भाग्योदय होतील

मेष : अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार मोठी भाग्यबीजं पेरेल. व्यावसायिकांची धनचिंता जाईल घरातील तरुणांचे भाग्योदय ता. १ व २ हे दिवस उत्तम घडामोडींचे. मात्र भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात हरवाहरवींपासून जपावं. शनिवारचे सूर्यग्रहण सांभाळावे.

मोठे व्यावसायिक लाभ शक्य

वृषभ : सप्ताहात रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे व्यावसायिक धनलाभ अपेक्षित आहेत. आजचा रविवार छानच. ता. ३० आणि ता. १ हे दिवस तरुणांना मुलाखतींतून यश देणारे. कृत्तिका नक्षत्राचे कोर्टप्रकरण संपेल. ता. ४ डिसेंबरच्या सूर्यग्रहणाजवळ नातेवाइकांशी वाद नकोत.

कला-छंदांमधून प्रसिद्धी

मिथुन : सप्ताहावर शुभ ग्रहांची सत्ता राहीलच. गृहिणींची स्वप्नं पूर्ण होतील. पुत्रोत्कर्षातून धन्यता ! मृग नक्षत्राच्या व्यक्तींना कला, छंद माध्यमातून प्रसिद्धी. सप्ताहात आर्द्रा व्यक्तींनी भांडखोर व्यक्तींपासून सावध. ता. ३० आणि ता. १ हे दिवस पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडवतील. ग्रहणाजवळ वाहन सांभाळा.

सुवार्तांची परंपरा राखली जाईल

कर्क : सप्ताहाचा आरंभ मोठ्या सुवार्तांचाच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट कायदेशीर प्रकरणातून यश. उद्याचा सोमवार सुवार्तांची परंपरा ठेवेल. मोठी अवघड कामे होतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ चा दिवस मानवी उपद्रवाचा. नोकरीत सांभाळा. ग्रहणाजवळ चोरी-नुकसानी जपा.

व्यावसायिकांच्या मार्केटिंगला यश

सिंह : सप्ताहाचा ट्रॅक मोठा सुंदर. पूर्वा आणि उत्तरा या नक्षत्रांच्या व्यक्तींना फलंदाजीचेच फिल्ड. तरुणांचे परिचयोत्तर विवाह. व्यावसायिकांचे मार्केटिंग यशस्वी होईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ हा दिवस एकूणच छान. ता. ४ डिसेंबरच्या ग्रहणाजवळ दुष्टोत्तरे टाळा.

नोकरीत साहेबांची मर्जी राहील

कन्या : राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये शुक्रभ्रमणातून लाभ घेणारी रास. सहवासातील स्त्रीमुळे लाभ होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ व्यावसायिक मोठ्या धनवर्षावाचा. घरात कार्ये ठरतील. नूतन वास्तुप्रवेश. हस्त नक्षत्रास राजकीय व्यक्तींकडून लाभ. नोकरीत साहेबांची मर्जी. शनिवारी प्रवासात जपा.

घराचे स्वप्न पूर्ण होईल

तूळ : सप्ताहातील ग्रहमान स्वतंत्र व्यावसायिकांना छानत राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. भावाबहिणीं-मध्ये सलोखा नांदेल. ता. १ चा बुधवार चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना फ्लॅशन्यूजमध्ये आणेल. विशिष्ट सन्मान. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी खर्चाचे प्रसंग.

तरुणांचा भाग्योदय होईल

वृश्‍चिक : थोडा प्रदूषित असाच सप्ताह वाटतो. आहारविहारादी पथ्यं पाळाच. बाकी ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाच्या मॅंडेटरी ओव्हर्स छानच राहतील. घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात कोर्टप्रकरणातून सुसंवादी. शनिवारी धडपडू नका.

व्यवसायात विक्रमी प्राप्ती

धनू : राशीच्या शुक्राच्या मॅंडेटरी ओव्हर्सचा लाभ घेणार आहात. तरुणांनो विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्याच ! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना पूर्वसंचितातून लाभ होतील. अर्थातच गुरूभ्रमणातून पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विक्रमी व्यावसायिक प्राप्तीचा. मात्र शनिवारचे सूर्यग्रहण विचित्र जागरणाचे.

मोठे आर्थिक व्यवहार होतील

मकर : सप्ताह थोडा ओढाताणीचाच. वादग्रस्त मुद्दे टाळा. भावाबहिणींशी सौहार्दपूर्ण वागणूक ठेवा. बाकी चाणाक्ष मंडळी रवी-बुध युतियोगांचा उत्तम लाभ उठवतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात मोठ्या आर्थिक व्यवहारांची. धनिष्ठा नक्षत्रास ता. २ हा दिवस बॅड डे राहील. मौनात राहा.

न्यायालयीन प्रकरणात यश

कुंभ : सप्ताहातील एक बलसंपन्न रास राहील. पूर्वाभाद्रपदा व्यक्ती विशेष लाभ उठवतील. ता. १ चा बुधवार मोठे विजय नोंदवेल. सतत शुभ घटनांतून चर्चेत राहाल. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती एखादे कोर्टप्रकरण जिंकतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी अनुदान. मात्र शनिवार स्त्रीविरोधी.

वास्तूविषयक साशंकता संपेल

मीन : शुक्रभ्रमणाच्या मॅंडेटरी ओव्हर्सचा पूर्ण लाभ घ्याल. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होतील. ता. २८, २९ आणि ३० हे दिवस शुभ ग्रहांच्या स्पंदनांचेच. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना भागीदारींतून लाभ. वास्तूविषयक व्यवहारातील साशंकता जाईल. शनिवारी पितृचिंता सतावू शकते. काळजी घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Latest Maharashtra News Updates : एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

SCROLL FOR NEXT