weekly horoscope 15 September 2024 to 21 September 2024 Sakal
Weekly Horoscope | साप्ताहिक राशी भविष्य

Weekly Horoscope 2024 : साप्ताहिक राशिभविष्य (२२ सप्टेंबर २०२४ ते २८ सप्टेंबर २०२४ )

weekly Rashi bhavishya : राशीचा मंगळ वादग्रस्त पार्श्वभूमीवर त्रासांचा. भावाबहिणींशी वाद टाळा. आर्द्रा नक्षत्रास कामगारपीडेतून त्रास.

सकाळ वृत्तसेवा

स्पर्धात्मक यश मिळेल

मेष : अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तीनं ग्रहांचं फिल्ड थोडं संमिश्र स्वरूपाचं राहील. सप्ताहात विचित्र खर्चाचे प्रसंग येतील. खरेदीत फसू नका. सप्ताहात विशिष्ट औषधांची रिॲक्शन येऊ शकते. गर्भवतींनी सांभाळावं. ता. २४ व २५ हे दिवस तरुणांना शिक्षण, नोकरी आणि विवाह या घटकांतून उत्तम प्रतिसाद देतील. सप्ताहात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना एखादी पुत्रचिंता सतावू शकते. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मोठे स्पर्धात्मक यश मिळेल.

विशिष्ट मानसन्मान होतील

वृषभ : गुरुभ्रमणातून वेळोवेळी विशिष्ट रसद पुरवली जाईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना त्याचा लाभ होईल. ता. २४ ते २६ हे दिवस घरातील मानसिक स्पंदनं प्रसन्न ठेवतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना वरील दिवसांत नोकरीत विशिष्ट घडामोडीतून दिलासा मिळेलच. मात्र प्रेमिकांनी वादविवाद टाळावेत. वैवाहिक जीवनातून गैरसमज होऊ देऊ नयेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट मानसन्मान चकित करतील.

भावाबहिणींशी वाद टाळा

मिथुन : राशीचा मंगळ वादग्रस्त पार्श्वभूमीवर त्रासांचा. भावाबहिणींशी वाद टाळा. आर्द्रा नक्षत्रास कामगारपीडेतून त्रास. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात जुगारसदृश व्यवहार टाळावेतच. बाकी सप्ताहातील शुक्रभ्रमणातून ता. २४ ते २६ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. आर्द्रा व पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना छान नोकरीच्या संधी मिळतील. काहींचा परदेशात भाग्योदय होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

बँकांची कामं होतील

कर्क : पितृपंधरवड्यातही पूर्वसुकृत फळाला येईल. नवस फेडाल. सप्ताहारंभ तरुणांचा उत्साह वाढवेल. व्यावसायिकांची बँकांची कामं होतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमांतून लाभ होईल. वादग्रस्त वसुली होईल. मात्र पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी पैशाचं पाकिट जपावं. शुक्रभ्रमण घरातील प्रिय व्यक्तींच्या सुवार्तातून स्पंदनं भारलेली ठेवतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुपुष्यामृत लाभदायी ठरेल.

परदेशी व्यापारातून लाभ होईल

सिंह : पितृपंधरवडा पूर्वजांचे संकल्प पूर्णच करेल, मघा नक्षत्राच्या व्यक्तींना याची दिव्य प्रचिती मिळेल. एखादा व्यावसायिक गॉडफादर भेटेल. सप्ताहात परदेशस्थ तरुणांचे मोठे भाग्योदय होतील. पूर्वा नक्षत्रास ता. २४ ते २६ हे दिवस छप्पर फाडके देतील. काहींना परदेशी व्यापारातून मोठा धनवर्षाव होईल. काहींना राजकीय घडामोडींतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह अक्षरशः पर्वणीसारखा. ‍भक्तांना गुरुप्रचितीचा अनुभव येईल.

संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या

कन्या : सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना मोठा फलद्रूप होईल. नोकरी व व्यावसायिक प्रगतीच्या संधी येतील. पितृपंधरवड्यातही चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुप्रचिती येईल. नोकरीत पगारवाढ होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस घरात आनंदाचे राहतील. तरुणांचे भाग्योदय होतील. काहींचा परदेशी भाग्योदय आहे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक प्राप्ती उत्तम ठेवेल. मात्र संसर्गजन्य बाधेपासून सावध.

आर्थिक संकट टळेल

तूळ : सप्ताह आरोग्यविषयक बाबींतून जपण्याचा. प्रवासात दक्षता घ्या. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ गुप्तचिंतेतून हैराण करणारा. नोकरीतील राजकारणातून त्रासाची शक्यता. व्यावसायिक उसनवारी अंगाशी येईल. राशीचे शुक्रभ्रमण अकल्पित गाठीभेटीतून लाभ देईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची विवाहाकडे वाटचाल होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे आर्थिक संकट टळेल. नोकरीत परिस्थितीजन्य लाभ होतील.

गुप्तशत्रूंपासून काळजी घ्या

वृश्चिक : सप्ताहात ग्रहांचा पट फलंदाजीचा नाहीच. फक्त फिल्डवर टिकून राहा. गुप्तशत्रूंपासून सांभाळा. बेकायदेशीर व्यवहार टाळा. बाकी गुरुभ्रमणातून उत्तम रसद पुरवली जाईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा उत्तम लाभ घेतील. मंगळवार सुवार्तांतून थक्क करेल. ता. २६ व २८ हे दिवस वैवाहिक प्रश्न सोडवतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट वसुलीतून लाभ होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अन्नपाण्यातील संसर्गातून त्रास होण्याची शक्यता आहे. काहींना त्वचा विकाराचा त्रास शक्य.

स्वतंत्र व्यावसायिकांना लाभ

धनू : ग्रहांचा पट अपवादात्मक वाटतो. सर्वत्र अवधान ठेवा. घरी-दारी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ होतील. ता. २४ व २६ हे दिवस मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत प्रसन्न ठेवतील. योग्य ठिकाणी बदली होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीचा लाभ. पती वा पत्नीचा भाग्योदय. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या दिनक्रमात भाजण्या-कापण्याचे प्रसंग संभवतात.

सरकारी कामांमध्ये यश लाभेल

मकर : शुक्रभ्रमणाची एक लिंक राहील. ता. २६ व २८ हे दिवस सुसंगत राहतील. व्यावसायिकांना सरकारी कामांतून यश. पती वा पत्नीला उत्तम नोकरीचा लाभ होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांच्या पॅकेजचा लाभ. काहींना बढतीची चाहूल लागेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुपुष्यामृत योगाचा उत्तम लाभ होईल. राजकीय व्यक्तीकडून कामं होतील. पुत्रचिंता जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना स्वप्नदृष्टान्त होईल.

मुलाखतींमध्ये छाप पाडाल

कुंभ : ग्रहमान साडेसातीच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षित ठेवणारे. अकारण जनसंपर्क टाळाच. अपरिचित व्यक्तींशी व्यवहार नकोत. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. बाकी सप्ताहात शुक्रभ्रमणाची एक मस्त लिंक राहील. त्याचा तरुणांना फायदा होईल. वैयक्तिक कलागुणांतून पुढे याल. नोकरीच्या मुलाखतीतून छाप पाडाल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुपुष्यामृत योग भाग्यसंकेत देईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल.

मोह-संमोहन टाळाच

मीन : ग्रहांच्या फिल्डवर धावबाद होऊ नका. अर्थातच मोह टाळा. प्रेमप्रकरणात पडू नका. कोणताही ओव्हरटेक नकोच. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी पूर्ण काळजी घ्यावी. घरातील वादविवाद सांभाळा. आध्यात्मिक प्रचिती देणारेच ग्रहमान आहे. दैवी संकेत मिळतीलच. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ ते २८ हे दिवस शुभग्रहांच्या पॅकेजमधून लाभ देतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मानांकन लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT