actress sonam kapoor birthday income salary house and cars collection file image
बॉलिवूडमध्ये आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. आज तिचा 36 वा वाढदिवस आहे.आपल्या सौंदर्याने सोनम प्रेक्षकांची नेहमीच मनं जिंकते. सोनमचा जन्म 9 जून 1985 रोजी मुंबईमध्ये झाला. सोनमचे वडिल अनिल कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. सोनमने बॉलिवूडमधील तिच्या करिअरची सुरूवात संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक या चित्रपटामधून केली. या चित्रपटामध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या चित्रपटामधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सोनम तिचे आयुष्य अतिशय रॉयल आणि स्टाईलिश पद्धतीने जगते. एका रिपोर्टनुसार सोनमची एकूण संपत्ती एकूण १३ दशलक्ष डॉलर इतकी आहे.काही वर्षांपुर्वी सोनमने मुंबईमध्ये एक आलिशान घर घेतले आहे. तिच्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 24.6 कोटी रूपये आहे. सोनमकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. तिच्या जवळ Mini Cooper, Mercedes Benz आणि Audi या महागड्या गाड्या आहेत. सोनम एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रूपये मानधन घेते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.