सर्वांच्या घराघरात पोहोचलेली, अनेकांची मने जिंकलेली मराठमोळी अभिनेत्री अलका कुबल यांचा आज वाढदिवस
अलका कुबल यांनी वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहेत. 23 सप्टेंबर 1963 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला.दहावीत असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या.मराठीत सासर-माहेर सिनेमांची लाट आणण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल.अलका कुबल हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत जाऊन पोहोचले. आजही अलका कुबल यांचे नाव काढताच माहेरची साडी रसिकांना नाही आठवला तर नवलच. माहेरची साडी या चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.याबरोबरच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले.आजही अलका कुबल यांची जादु कायम आहे. अलका कुबल यांनी दोनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.अलका कुबल यांचा एक मोठा चाहता वर्गदेखील आहे.अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये हे फिल्म इंडस्ट्रीतील एक दिग्गज सिनेमेट्रोग्राफर म्हणून ओळखले जातात.अलका आणि समीर आठल्ये यांची मोठी मुलगी ईशानी व्यवसायाने पायलट आहे. तर छोटी मुलगी कस्तुरी ही परदेशात डरमॅटोलॉजिस्टचे शिक्षण घेत आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.