तुमच्या पायांना अथवा पायांची बाेट दुखत असतील अथवा खाज सुटली असेल तर तुम्हांला एथलीट फूट या राेगाची लक्षणे आहेत. या आजारावर काही घरगुती उपाय जाणून घ्या
एथलीट फूट यास टिनिया पेडिस असेही संबाेधिले जाते. तुमच्या पायाच्या त्वचेस ताे हानी पाेहचविता. केवळ पायांनाच नव्हे तर हातांवर देखील याचा प्रभाव हाेऊ शकताे. खेळाडूंना हा आजार हाेण्याचा अधिक संभव असताे.तुमच्या पायांवर टिनिया बुर्शी जमा झाल्यानंतर एथलीट फूट हाेताे. तुम्ही एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास बुरशीच्या दूषित पृष्ठभागाला स्पर्श करून ते बुरशीचे पकडू शकतात. उबदार आर्द्र वातावरणात बुरशी साठते.ताजे दही सुख्या, जळालेल्या त्वचेस शांत करते. यामुळेच ताजे दही संसर्ग झालेल्या भागावर लावावे.टी ट्री तेलाची काही थेंब जैतून अथवा खाेबरले तेल मिसळून ते ज्या ठिकाणी संसर्ग झालाय तेथे 2-4 वेळा लावावे. जेणेकरुन संसर्ग राेखण्यास मदत हाेते. बेकिंग साेडा हे बुरशीजन्य पदार्थांस राेखण्याचे काम करताे. बेकिंग साेडा आणि पाण्याची पेस्ट करुन ताे तयार करावा. ज्या भागात (त्वचेवर) संसर्ग झाला आहे तेथे लावावे.लसणाचे खूप फायदे आहेत. चूरा केलेल्या लसणाचा जैतून तेला अथवा बदामाच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करा. ज्या भागात (त्वचा) संसर्ग झालाय तेथे लावावी. संक्रमण राेखण्यासाठी 5-10 मिनीट गरम पाण्यात समुद्रातील मीठ टाकून पाय साेडावेत. याचा निश्चित तुम्हांला आराम मिळताे आणि हे मिश्रण बुरशी राेखण्या मदत करते.एका गाेलाकार भांड्यात व्हिनेगर घ्या. त्यामध्ये दरराेज 10 मिनीट पाय बूडवून ठेवा. यामुळे आम्लं वातावरण तयार हाेते आणि बुरशी राेखण्यास मदत हाेते. एथलीट फूट ही गंभीर समस्या नसून घरगुती उपायांच्या माध्यमातून त्यावर मात करता येऊ शकते. हे उपाय करण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला देखील घ्यावा. घरगुती उपायांतून बरं नाही वाटलं तर वैद्यकीय अधिका-यांशी संपर्क साधा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.