bhagyashree mote bhagyashree mote/ instagram
प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतेच भाग्यश्रीने इन्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशल घेतले. यामध्ये तिच्या अनेक चाहत्यांनी तिला प्रश्न विचारले.एका चाहत्याने भाग्यश्रीला प्रश्न विचारला की,'मराठीमधील प्रमुख भूमिका की हिंदीमधील पाच मिनिटांची भूमिका?' तर यावर भाग्यश्रीने उत्तर दिले, 'मुझे मेरे कुअे से प्यार है (मराठी इंडस्ट्रीतच मी खूश आहे)'एका नेटकऱ्याने भाग्यश्रीला प्रश्न विचारला, ' जर तुम्हाला मराठी बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर?' भाग्यश्रीने त्याला उत्तर दिले, 'तर तुम्ही मला तिकडे बघाल'एका यूजरने भाग्यश्रीला विचारले की , 'लग्न झाले आहे का? आणि नसेल झाले तर पार्टनर कसा पाहिजे?' या प्रश्नावर भाग्यश्रीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. भाग्यश्री म्हणली, 'मी माझ्या कामासोबत लग्न केले आहे आणि मी आनंदी आहे.' भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.