Celibrities tested positive after Karan's Birthday Party esakal
फोटोग्राफी

करण जोहरची पार्टी सेलिब्रिटींना पडली महागात..

करणच्या बर्थडे पार्टीतील जवळपास ५०-५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येतेय.

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवुडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला.मुंबई येथील 'यशराज फिल्म्स स्टुडिओमधे' त्याने जंगी बर्थडे पार्टीचं (Birthday Party) आयोजन केलं होतं.या पार्टीमधे सर्व दिग्गज बॉलीवुड कलाकारांचा समावेश होता.सर्व कलाकारांचे एन्ट्री फोटोजही सोशल मीडियावर बरेच चर्चेत होते.मात्र ही जंगी पार्टी अनेकांना महागात पडली.

पार्टीनंतर अनेकांना करोनाची लागण झाली.करणच्या जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींना करोनाची लागण झाल्याचे कळतेय.(Bollywood Celibrities)करनच्या या पार्टीत सलमान खान,कतरिना कैफ,शाहरूख खान,कियारा अडवाणी,जान्हवी कपूर,ऐश्वर्या राय बच्चन,अभिषेक बच्चन आणि असंख्य बॉलीवुड कलाकारांबरोबरच टॉलीवुड कलाकारांचाही समावेश होता.करणच्या बर्थडे पार्टीतील जवळपास ५०-५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येतेय.
अनेकांनी त्यांना करोना झाल्याची माहिती लपवली आहे तर कार्तिक आर्यनच्या करोनाची बातमी चांगलीच चर्चेत आहे.(Karan Johar)त्यामुळे करणची पार्टी आणखी एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
याआधी करणने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते.त्यावेळी पार्टीत उपस्थित सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती.तेव्हा राजकीय नेत्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला होता.शेवटी करणला पोस्ट लिहून स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
यावेळच्या जंगी पार्टीतूनही सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्यानं करण परत एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय.त्याची या वेळची पार्टीही सेलिब्रिटींना महागात पडलेली दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षाच्या पूर्वसंध्येला उजनी धरण १०० टक्के भरेलेलेच; शेतकऱ्यांना १५ जानेवारीनंतर रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन, वाचा...

आजचे राशिभविष्य - 29 डिसेंबर 2025

Morning Breakfast Recipe: गव्हाच्या पीठात कांदा टाकून बनवा 'हा' खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

Satara Crime:'शिरवळला मारहाणीतून एकाचा खून';दोघेजण पाेलिसांच्या ताब्‍यात, एकुलता एक मुलाबाबत घडला धक्कादायक प्रकार?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT