CWG 2022 10 Indian Player Who Can Bring Gold Medals In Birmingham 2022 Commonwealth Games esakal
बर्मिंगहम : राष्ट्रकुल 2022 स्पर्धा (Commonwealth Games 2022) सुरू होण्यास काही दिवसच बाकी आहेत. 28 जुलैपासून बर्मिंगहममध्ये राष्ट्रकुल खेळांना सुवात होईल. या स्पर्धेत भारताचे (India) 215 सदस्य सामील होणार आहेत. यातील 108 पुरूष आणि 107 महिला खेळाडूंचा समावेशी आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 26 पदके जिंकली होती. यातील सर्वाधिक पदके ही शूटिंगमध्ये मिळाली होती. यावेळी शूटिंग राष्ट्रकुल स्पर्धेचा भाग असणार नाही. त्यामुळे भारताची पदकांची दावेदारी थोडी कमी झाली आहे. असे असले तरी भारताचे 10 खेळाडू असे आहेत की जे राष्ट्रकुल स्पर्धेत हमकास पदक जिंकून देतील अशी आपेक्षा आहे. (CWG 2022 10 Indian Player Who Can Bring Gold In Birmingham 2022 Commonwealth Games)
मनिका बत्रा (टेबल टेनिस) :
गेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत मनिका बत्राने एकेरी बरोबरच महिला सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते. तिने सर्व मिळून 4 पदके आपल्या नावर केली होती. आता देशाला पुन्हा एकदा तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. बजरंग पुनिया (कुस्ती) :
बजरंग पुनियाने देखील ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली होती. राष्टकुल स्पर्धेत त्याने गेल्यावेळी सुवर्णपदक पटकावले होते. आता पुन्हा एकदा तो सुवर्ण पदकाचा दावेदार असणार आहे.
लक्ष्य सेन (बॅडमिंटन) :
20 वर्षाचा लक्ष्य राष्टकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आहे. तो थॉमस कपमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्याच्या नावावर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ही पदक आहे.
पी. व्ही, सिंधू (बॅडमिंटन) :
बॅडमिंटन जगतातील अव्वल फुलराणी पी. व्ही. सिंधूने प्रत्येक मोठ्या स्पर्धेत पदक पटकावले आहे. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत देखील सुवर्ण पदक जिंकले होते. दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूकडून यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये देखील सुवर्णाचीच अपेक्षा असेल.
मीराबाई चानू (वेट लिफ्टिंग) :
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूकडे सध्या दोन राष्ट्रकुल पदके आहेत. तिने 2014 मध्ये रौप्य आणि 2018 मध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. आता ती राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल. रवी कुमार दहिया (कुस्ती) :
ऑलिम्पिक पदक विजेत्या रवी कुमार दहिया 57 किलो वजनी गटात राष्ट्रकुल स्पर्धेत उतरणार आहे. तो या वजनी गटात सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याने एशियन चॅम्पियनशिपमध्ये देखील सुवर्ण पदक जिंकले होते. निखत झरीन (बॉक्सिंग) :
निखत झरीनने मे महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. ती पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणार आहे. तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
अमित पांघल (बॉक्सिंग) :
2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत फायनलमध्ये अमित पांघल इंग्लिश बॉक्सरकडून हरला होता. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आता याच रौप्य पदकाचे रूपांतर सुवर्ण पदकात करण्यासाठी तो रिंगमध्ये उतरले. 51 किलो वजनी गटात त्याच्या वावर वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल देखील आहे.
विनेश फोगाट (कुस्ती) :
53 किलो वजनी गटात विनेश फोगाट सुवर्ण पदकाची अव्वल दावेदार आहे. तिने यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत. याचबरोबर तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील पदक जिंकले आहे.
नीरज चोप्रा (भालाफेक) :
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीराज चोप्राकडून राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खूप आशा आहेत. तो सध्या 90 मीटर भाला फेकण्याच्या टार्गेटच्या अगदी जवळ पोहचला आहे. त्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत देखील सुवर्ण फेकी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.