संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या छतावर ६.५ मीटर उंच अशोकस्तंभ बांधण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने जाणून घेऊ या अशोकस्तंभाचा इतिहास.
अशोकस्तंभ हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक किंवा राजमुद्रा आहे. कोणत्याही देशासाठी, त्यांचे राष्ट्रीय चिन्ह ही त्यांची ओळख असते. राष्ट्रीय चिन्ह हे सर्वांत दृश्य चिन्हांपैकी एक आहे आणि ते संविधानाची प्रतिमा प्रतिबिंबित करते. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे आणि २६ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रीय चिन्ह म्हणून ते स्वीकारण्यात आले. मुंडक उपनिषदातून घेतलेल्या 'सत्यमेव जयते' या ब्रीदवाक्यासह हे प्रतीक स्वीकारण्यात आले.या राष्ट्रीय चिन्हावर चार सिंह आहेत, जे चार वेगवेगळ्या दिशांना तोंड करून एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसलेले दिसतात. हे चार सिंह धैर्य, अभिमान, सामर्थ्य आणि आत्मविश्वास दर्शवतात. देशाच्या राष्ट्रीय चिन्हाच्या 2D दृश्यानुसार, समोर फक्त एक अशोक चक्र दिसत आहे आणि त्यात डावीकडे धावणारा घोडा आणि उजवीकडे एक बैल आहे. असे मानले जाते की सिंह तसेच इतर प्राणी गौतम बुद्धांच्या जीवनाच्या चार टप्प्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि सिंह हे ज्ञानप्राप्तीची अवस्था दर्शवतात. बैल बुद्धाच्या राशीचे चिन्ह वृषभ आणि हत्ती त्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. बुद्धांनी पहिला उपदेश
केल्यानंतरच्या त्यांच्या स्वारीचे प्रतीक म्हणून घोडा आहे.हा स्तंभ इसवीसनपूर्व २५०मध्ये सम्राट अशोकाने सारनाथ येथे बांधला. बुद्धांनी आपला पहिला उपदेश उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे दिला. फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल यांनी १९०५ मध्ये हे उत्खनन केले होते. अशोक चक्र हे बौद्ध धर्मातील धर्माचे चाक किंवा कायद्याचे प्रतीक आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशाचे नेते राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरता येईल अशा चिन्हाच्या शोधात होते. बर्याच प्रयत्नांनंतर नागरी सेवा अधिकारी बद्रुद्दीन तैयबजी आणि त्यांची पत्नी सुरैया तैयबजी यांनी यासाठी लायन कॅपिटलचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव मांडला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.