अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न झाले आहे. .लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाला आहे. गिरगाव चौपाटीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. .लालबागच्या राजाचा तराफा समुद्रात धक्का देऊन ढकलला अनंत अंबानी यांचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवानी तराफा पाण्यात ढकलला समुद्रात भरती होत असल्याने तराफा ढकलण्यात यश लालबागचा राजाचा तराफा समुद्रात तरंगण्यास सुरुवात.लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहे. मूर्ती तराफ्यावर चढवली आहे. .अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जासाठी दाखल झाले आहेत..गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची आरती झाली आहे. .लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री साडेदहानंतर होणार आहे. मात्र यावेळी ग्रहण लागत आहे.. विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विट्याच्या राजाला ढोल, ताशाच्या गजरात मिरवणूकीने भक्तीभावाने निरोप देण्यात आला. कोल्हापूरच्या पथकाने मिरवणूकीत अघोरी नृत्य सादर केले. विट्याच्या राजाला निरोप देण्यासाठी विटा शहरातील गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. विटा शहरात ठिकठिकाणी विट्याच्या राजा गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली..एरंडोल येथे गणेश विसर्जन शांततेत पार पडले. विसर्जन मिरवणुकीत अठरा सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी झाले होते. दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुक सुरू झाल्यानंतर पहाटे पाच वाजता मिरवणूक समाप्त झाली. नगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यासात आलेल्या गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रात शेकडो मुर्तींचे संकलन केल्यानंतर विधीवत पुजा करून विसर्जन करण्यात आले..> रात्री 12 वाजता डीजेचा दणदणाट बंद. सकाळी पुन्हा मिरवणुका सुरू होतील.> पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर नऊ वाजून 23 मिनिटांनी विसर्जन.> पुण्यात लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलाना अश्रू अनावर. आई वडील आणि पालिका कर्मचारी समजूत काढताना दिसून आले. गणपती देव हा आपला वाटतो, अशा भावना या चिमुकल्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.> रात्री देखील मेट्रो आणि मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी. विसर्जन मिरवणुका पाहून गणेश भक्त मेट्रोने घरी गेले> कुमठेकर रस्त्यावर मंडळे प्रचंड धीम्या गतीने मार्गक्रमण करत होती. रात्री 12 पर्यंत केवळ 12 मंडळे फडतरे चौकातून मार्गस्थ झाली. शेवटी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आणि सर्वांना पुढे घेऊन जाताना दिस होते. मंडळे डीजे, रथ पुढे घेऊन जात होती.> रात्री साडे बाराच्या सुमारास दोन मंडळातील अंतर कमी करून मिरवणुका मार्गस्थ करण्यासाठी पोलीस यंत्रणा सरसावली. पारंपारिक वाद्य वाजनावर मिरवणुका सुरू होत्या. गावाकडील ढोल लेझीमचा दणदणाट सुरू आहे. मार्केट यार्डचा शारदा गजानन रात्री साडे बारापर्यंत अभिनव चौकापर्यंत आलेला नव्हता.> रात्री दीडच्या सुमारास अलका टॉकीज चौकात वाद. पोलिसांनी घटनास्थळी. परिस्थिती नियंत्रणात.> रात्री दोनच्या सुमारास सारस्वत बँक जवळ जय शारदा गजानन मिरवणुकीचे अश्वमेध ढोल ताशा पथकाच्या वादनाने रंगत आणली.> रात्री दोननंतर टिळक रोडवरील गर्दी ओसरली.सकाळी सहा नंतर पुन्हा डिझेलचा दणदणाट सुरू चार वाजून 45 मिनिटांनी मिरवणूक संपली मेट्रो नी मोठ्या प्रमाणावर लोक आले होते . त्यामुळे मंडळांना निघायला उशीर झाला.पुण्यातील विसर्जन मिरवणूक 32 तासानंतर संपली आहे. अशी माहिती सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. थोड्याफार किरकोळ घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक पुणेकर हा आमच्यासाठी महत्त्वाचा होता. तो सुखरूप घरी पोहोचला आहे. पुणे पोलिसांनी जे नियोजन केलेलं होतं त्या नियोजनामध्ये मानाचे गणपती होते त्यांनी त्यांची मिरवणूक वेळेत संपवली होती. मोठ्या संख्येने लोक गणपती पाहण्यासाठी आले होते. मेट्रो ने तीन लाख लोकांनी काल प्रवास केला त्याची आकडेवारी समोर आली. खाजगी गाड्यांनी किंवा इतर वाहनांनी गणपती पाहण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे इतर मंडळांच्या रतन ना जागा मिळत नव्हती. सर्व रस्त्यांवरती लोक होते त्यामुळे मोठा विलंब जो आहे तो या मिरवणुकीत झाला असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली. त्यांच्याबरोबर बातचीत केले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी .शेवटचा मानाचा गणपती अलका चौकात दाखल इतर रस्त्यावरील मंडळ गेल्यानंतर महराष्ट्र तरुण मंडळ पुढे जाणार केळकर रास्ता आणि शास्त्री रस्ता आणखी मंडळ असल्याने शेवटचा गणपती अलका चौकात थांबलं विसर्जन मिरवणूक 32 तासात संपणार अर्धा तासांत सार्वजनिक विसरर्जन मिरवणूक संपणार?पोलीस आयुक्त टिळक चौकात दाखल झालेत.शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासावरून गेली एकतीस तासांवर..दरवर्षी पेक्षा यावर्षी जास्त वेळ लागला आहे.गणपती विसर्जन मिरवणुकीचा 77 वर्षांचा इतिहास यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी त्यामुळे सरासरी 30 तासांचा विक्रम यांना मोडीत निघाला 1948 पासून ते 2025 पर्यंत कुठल्या वर्षी मिरवणुकीला किती वेळ लागला.वर्ष तास 1948 6 तास 30 मी1949. 8 तास 1952 9 तास 15 मी1953. 9 तास 30 मी1954. 11 तास1967. 17 तास 24 मी1978 21 तास 30 मी1989. 29 तास 25 मी2005 33 तास 20 मी 2016 ते 2019 28 तास 15 मी 2020 ते 2021 कोरोनामुळे मिरवणूक नाही.2022. 31 तास 2024 30 तास 15 मी 2025 अजून मिरवणूक सुरू.पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला कालपासून सुरुवात झाली असून, २९ तासांपेक्षा जास्त वेळ उलटूनही ती अद्याप सुरूच आहे. या विलंबामुळे पुणे पोलिसांचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र दिसत आहे. पुणे पोलिसांनी मिरवणुकीसाठी योग्य नियोजन केल्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसत आहे. मिरवणूक अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून होणारे नाच-गाणे आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे मिरवणुकीला आणखी उशीर होत आहे. विशेषतः अलका टॉकीज चौकात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. .पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबलअलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी उडवले फटाकेनियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळलीएकजण ताब्यात पोलिसांच्या नाकावर टिचून फोडले चौकात फटाके .नाशिकच्या म्हसरुळ परिसरात बाप्पाला निरोप देतांना सई कदम या एका चार वर्षांच्या चिमुकलीला अश्रू अनावर झाले होते, बाप्पा त्यांच्या मम्मी पप्पांना भेटून परत येणार आहेत असं सईला तिची आई वारंवार सांगत होती मात्र बाप्पाचे विसर्जन करू नका असा हट्ट करत सई लाडक्या बाप्पाचा हातच सोडायला तयार नव्हती.. सोशल मिडीयात हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय...पुण्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६३ गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान ६०-७० मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीच सुक्ष्म नियोजन केलं होतं आणि २४ तासात मिरवणूका संपवणार अस सांगितल होत मानाचे पाच आणि बाकी महत्वाच्या मंडळांनी वेळा पाळल्या पण त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. मिरवणूक संपायला २-३ वाजण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी मिरवनुक संपायला २:३० वाजले होते. १८९ मंडळ मार्गस्थ झाले होते. २८ तासांनी मिरवणूक संपली होती..मूर्ती आतमध्ये नेऊनच विसर्जन केलं जाणार, तराफा तयार ठेवलाय, पाण्याची पातळी वाढल्यानं तराफ्यावर मूर्ती चढवणं कठीण झालंय. पाणी कमी झालं की मूर्ती तराफ्यावर नेऊन खोल पाण्यातच विसर्जन केलं जाईल असं लालबागच्या राजा मंडळाकडून सांगण्यात आलंय..चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन झालं असून लालबागच्या राजाच्य विसर्जन अंतिम टप्प्यात आहे. काही तांत्रिक कारणांमुंळे विसर्जनाला उशीर होत असल्याची माहिती आहे..लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात आहे .गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं मूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहे. तर दुसरीकडे चिंचपोकळीचा चिंतामणी तराफ्यावर चढवला असून त्याला निरोप दिला जात आहे..विसर्जनासाठी खास तराफा बनवण्यात आलाय, गुजरातमधून तो आणलाय, भरतीच्या वेळी किनाऱ्यावर पाणी वाढण्याआधी तराफ्यावर चढवायला हवं होतं. पण ते तराफ्यावर चढवता आलं नाही. आता दागिने काढले जातायत. हार होते ते काढले जातायत. विसर्जनाची तयारी सुरू आहे. लालबागच्या राजाचं दरवर्षी विसर्जन केलं जातं तिथं विसर्जन कसं केलं जाणार, मोठा तराफा आणला, स्वंयचलित तराफा आणला होता. अत्याधुनिक तराफा आणल्यानंतरही तो अडकला आहे. तराफ्यावर मूर्ती चढवता आली नाही. आता लालबागच्या मूर्तीचं विसर्जन करण्याची तयारी सुरू आहे..गणेश भक्तांच्या उत्साहात निघालेला लालबागचा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. थोड्याच वेळात विसर्जन होणार असून, यावेळी बोटीद्वारे विसर्जन न होता गुजरातमध्ये बनविण्यात आलेल्या स्वयंचलित तराफ्याद्वारे होणार आहे..गणेश भक्तांच्या उत्साहात निघालेला लालबागचा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. थोड्याच वेळात विसर्जन होणार असून, गणेशभक्तांनी चौपाटीवर मोठी गर्दी केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी विसर्जनावेळी उपस्थित आहेत..अखंड जल्लोषात सुरू असलेली पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच असून गेल्या २२ तासांपासून शहरात मिरवणुकीचा उत्साह दिसून येत आहे. .गणेश भक्तांच्या उत्साहात निघालेला लालबागचा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. थोड्याच वेळात विसर्जन होणार असून, गणेशभक्तांनी चौपाटीवर मोठी गर्दी केली आहे. .गणेश भक्तांच्या उत्साहात निघालेला लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीतून पुढे सरकत अखेर गिरगावमध्ये दाखल झाला आहे. जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात राजा पुढील मार्गक्रमण करत असून गिरगाव चौपाटीवर गणेभक्तांची मोठी गर्दी झाली आहे..मुंबईतील गिरगाव चौपाटीसह अन्य चौपाट्यांवर मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन करण्यात येत आहे दरम्यान या चौपाट्यांवर बीएमसी आणि दिव्याज फाउंडेशनकडून स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात अमृता फडणवीस यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार यांनी सहभाग घेतला. .गणेश भक्तांच्या उत्साहात निघालेला लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीतून पुढे सरकत अखेर ओपेरा हाऊस परिसरात दाखल झाला आहे. भक्तांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात राजा पुढील मार्गक्रमण करत असून रस्त्यावर श्रद्धाळूंची मोठी गर्दी उसळली आहे.अखंड जल्लोषात सुरू असलेली पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच असून गेल्या २० तासांपासून शहरात मिरवणुकीचा उत्साह दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १२ नंतर डी जे बंद करण्यात आले होते, मात्र सकाळी ६ वाजताच पुन्हा एकदा डी जे चा दणदणाट सुरू झाला आहे. दरम्यान, अलका टॉकीज चौकात विविध गणेश मंडळांचे विसर्जन रथ दाखल झाले आहेत. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जात आहे..लालबागचा राजा सुतार गल्लीत पोहोचला आहे..लालबागच्या राजाच्या भव्य विसर्जनाचा आनंद घेण्यासाठी सर्व कानाकोपऱ्यातून लोक जमले आहेत. भगवान गणेश त्यांच्या सिंहासनावर भव्य वैभवात विराजमान असल्याने, भक्त फक्त एक झलक किंवा त्यांच्या पायांना स्पर्श करण्याची संधी मिळविण्यासाठी आतुर असतात..लालबागचा राजा डॉन टाकीजवळ पोहोचला आहे. ही मिरवणूक आता डॉन टाकी येथे पोहोचली आहे. ज्याला टू टँक्स असेही म्हणतात. ही मिरवणूक मुंबईतील कुंभारवाडा भागात आहे..कार्तिकने त्याच्या चाहत्यांना मुंबईतील त्याच्या घरी गणेश विसर्जनाचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले. त्याने त्याच्या आईचे आरती करतानाचे काही फोटो शेअर केले..लालबागचा राजा भायखळ्याच्या क्लेअर रोडला पोहचला आहे. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे..रात्री ९ वाजेपर्यंत मुंबईतील विविध गणपतीच्या १८,००० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भव्य समारंभाची एक झलक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकांवर, टेरेसवर, बाल्कनीवर, झाडांवर आणि अगदी खांबांवर शेकडो लोक बसले होते..गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापुरात सौम्य लाठीमार बिन खांबी गणेश मंदिर चौकात RCP कडून लाठीमारगणेश विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी करणाऱ्यां कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १२ नंतर डी जे वाजवण्यास बंदी असल्याने पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीतील सर्व डी जे बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी साऊंडच्या भिंतीसह उभे असलेले गणेश मंडळांचे संच तिथेच थांबले असून मिरवणुकीच्या गतीवर परिणाम झाला आहे..१४ तासांच्या नंतर सुद्धा पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कायमरात्रीच्या ११.३० वाजता सुद्धा गणेश भक्तांचा उत्साह कायमअलका टॉकीज चौकात मोठी गर्दीडी जे चां दणदणाट सह ढोल ताशाच्या गजरावर तरुणाई थिरकत आहे.सांगली-मार्केट परिसरात हाणामारीची घटना घडली.मंडळांच्या पुढे-मागे होण्यावरून संघर्ष उफाळला.पोलिसांनी तत्काळ दोन्ही गट बाजूला केले.DYSP गिल्डा घटनास्थळी दाखल होऊन काही जणांना ताब्यात घेतले..तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमाशेत गणपती विसर्जनावेळी युवक पाण्यात बुडाला.युवक अद्याप सापडलेला नाही.अंधारातही शोध कार्य सुरू आहे.प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ निकराचे प्रयत्न करत आहेत..कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी धरला डॉल्बीवर ठेका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलं सतेज पाटील यांना खांद्यावर डीजेच्या ठेक्यावर सतेज पाटलांनी केला कार्यकर्त्यांसोबत डान्स.कोल्हापूरची माधुरी हत्ती परत द्या; पुण्यात मिरवणुकीत प्रतिकात्मक मिरवणूकपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत विविध विषयावरील देखावे.नाशिकमध्ये पहिल्यांदाच मध्यरात्री नंतरही गणेश विसर्जन मिरवणूक सुरू राहणार. मध्यरात्री 12 वाजता डीजे, साउंड सिस्टीम बंद केले जातील आणि पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक शेवटचा गणपती विसर्जित होईपर्यंत सुरू राहणार आहे. पोलीस आयुक्तांनी दिली परवानगी..गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे..अयोध्येत भाविकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले आहे. .मुंबईत मुसळधार पावसात, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी ३.०० वाजेपर्यंत २,१९८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यापैकी ५९ मूर्ती सार्वजनिक मंडळांमधील आहेत..पावसाच्या सरी असूनही मुंबईत लाखो लोक विसर्जन मिरवणुकीत सामील झाले आहेत..अनेक मोठे गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहे. विसर्जन काही वेळात होणार आहे..लासलगावमध्ये गणेश विसर्जनाला अभूतपूर्व उत्साहाची लगबग दिसली. क्रांती गणेश मित्र मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. विशेष म्हणजे महिलांनी परिधान केलेल्या लाल साड्यांमुळे संपूर्ण मिरवणूक रंगतदार बनली. तब्बल चार तास ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक चालली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पहिला गणपती खडक माळेगाव धरणात विसर्जित करण्यात आला..लालबागचा राजा मुंबईच्या चिंचपोकळी रेल्वे स्थानकावर पोहोचला आहे. .ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतीना पुणेकरांनी दिला निरोपमानाच्या पहिला कसबा गणपतीच विसर्जन तीन वाजून ४७ मिनिटांनी दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन चार वाजून १० मिनिटांनी पार पडलेतिसरा मानाचा गुरुची तालीम गणपतीचे नटराज घाट या ठिकाणी विसर्जन चार वाजून ३५ मिनिटाने पार पडलेमानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाट येथे विसर्जन पाच वाजून पार पडले आहेमानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन घाटावर कृत्रिम हौदात पाच वाजून ४० मिनिटांनी पार पडले.डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून जुहू चौपाटीवर निर्माल्य गोळा करण्याचे काम गोळा केलेल्या निर्माल्यापासून पासून खत निर्मिती महापालिका सहाय्यक आयुक्त चक्रपाणी आले यांच्याकडून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक.फुलंब्री शहरात गेल्या तब्बल ९० वर्षांपासून गणेशोत्सवात बैलगाडीतून निघणाऱ्या सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीची परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. १९३५ साली सुरू झालेली ही मिरवणूक आज गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रमुख आकर्षण बनली आहे..विसर्जनासाठी भक्तांचे कृत्रिम तलावाला पसंतीकृत्रिम तलावाच्या निर्मितीमुळे नैसर्गिक विसर्जन तळावरील गर्दीचा ओघ झाला कमीकृत्रिम तलावावर गर्दी झाल्यामुळे मुंबईतील जुहू चौपाटी या नैसर्गिक विसर्जन स्थळावर गर्दीचा ओघ कमीमहापालिकेकडून मुंबई आणि मुंबई उपनगरात 290 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली.लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. .लालबागच्या राजाच्या शाही विसर्जन सोहळा सुरू आहे. .मुरलीधर मोहोळ हे खरंतर केंद्रीय मंत्री... मात्र त्यांच्यातील नेतृत्व उभे राहीले ते सार्वजनिक गणेशोत्सवातून आणि याच सार्वजनिक गणेशोत्सवात मोहोळ हे दरवर्षी सक्रिय सहभाग घेतात... यंदाही केंद्रीय मंत्रीमंडळात असतानाही मोहोळ यांनी त्यांच्यातील गणेशोत्सव कार्यकर्ता जीवंत ठेवलाय... मोहोळ संस्थापक असलेल्या साई मित्र मंडळाचा उत्सवही धडाक्यात साजरा होतोय... आज प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या मिरवणुकीत मोहोळ आवर्जून सहभागी झाले... त्यांच्या साई मित्र मंडळाच्या मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला...पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. .भाजप नेते मोहित कंबोज यांचा गणपती विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर आणला आहे..लालबागचा राजा लालबाग परिसरातून पुन्हा लालबाग गेटजवळ आला आहे. स्वराजली पथक मानवंदना देत आहे. तरुणाई मोठ्या संख्येने दाखल आहेत..गणपती विसर्जन मिरवणुकीत तरुणांईचा मोठा सहभाग आहे. .मोठ्या उत्साहात पुणे- तांबडी गणपतीचे विसर्जन पार पडले आहे..मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह दिसून येत आहे..दहा दिवसाच्या उत्साहवर्धक गणेशोत्सवानंतर कारंजा शहरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या शिवाजी नगर येथील मराठा गणेश मंडळाने आपली मिरवणूक लेझीम पथक,ढोल,ताशे सह मुख्य मार्गावरुन वाजत गाजत काढण्यात आली. विशेष म्हणजे १०१ वर्षाची परंपरा असलेले मराठा गणेश मंडळ डि जे मुक्त मिरवणूक काढतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके व युवा नेते देवव्रत डहाके यांनी तर नगिना मस्जिद चौकात मौलवी व मुस्लिम बांधवांच्या वतीने मंडळाच्या अध्यक्ष, सचिवांचे पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.शहरातील मिरवणुकीत जवळपास ३६ गणेश मंडळे सहभागी होतात.यावेळी शांततेत मिरवणूक पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्या जातो..परळचा महाराजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. .परळचा राजा लालबाग येथे दाखल झाला आहे. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे..श्रॉफ बिल्डिंगने मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी केली आहे. .जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. .जुहू चौपाटीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणीमुंबई पोलीस दलातील 3 पोलिस उपायुक्तांनी केली जुहू चौपाटीवर सुरक्षेची पाहणीपोलीस उपायुक्तांनी स्थानिक जुहू आणि सांताक्रुज पोलिसांच्या बंदोबस्ताचा घेतला आढावा.गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लालबागमध्ये पोहोचत आहे. .यंदा श्री गणनायक रथातून निघणार दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूकदुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुक सुरू होणारपुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक यंदा श्री गणनायक रथातून निघणार आहे.उत्सवाचं यंदा 133 वं वर्ष आहे.यंदा 'श्री गणनायक' रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.या विसर्जन मिरवणुकीच्या रथाचे काम आता पूर्ण झालेल आहे.आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा केरळ मधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.या मंदिराला अनुसरून या विसर्जन रथाची मांडणी करण्यात आली आहे.विष्णूचे वाहन म्हणून श्री गणनायक रथावर समोरच्या बाजूला चार गरुड लावण्यात आलेले आहेत.8 स्तंभांवर हा रथ उभारण्यात आला आहे. केरळ मधील मंदिरांना असते त्याप्रमाणे या रथाला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.केरळमधील मंदिरांप्रमाणे गोपुराही यामध्ये साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलायं.त्याचप्रमाणे 30 क्रिस्टल झुंबर या रथाला बसविण्यात आले आहेत.तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या रथाला चार सीसीटीव्हीही बसवण्यात आलेले आहेत.लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. या मिरवणूकीत अभिनेता आदेश बांदेकरदेखील सहभागी झाले आहेत..दहा दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात निरोप दिला जातोय.पुण्याच्या इंदापूर पोलिसांनी देखील लाडक्या गणपती बाप्पाला वाजत गाजत पारंपरिक वाद्याच्या गजरात निरोप दिला आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत इंदापूर पोलिसांनी पारंपरिक वाद्यावर चांगलाच ठेकाही धरला....लालबागचा राजा मंडपातून बाहेर निघाला आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. फुलांचा वर्षाव करुन लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली आहे. लालबाग च राजा बरोबरच तेजुकाया चा गणपती देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे..मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखलआकर्षक मयूर रथात तुळशीबाग गणपती विराजमानतुळशीबाग मंडळाचे यंदा १२५ वे वर्षफुलांनी सजवलेल्या हा रथ मोबाईल मध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी.शिवमुद्रा पथकात महिलांनी खेळली लेझीममानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती समोर महिलांचे लेझीमनववारी साडी परिधान करून महिलांकडून लेझीम.विसर्जन मिरवणुकीला वरुण राजाचा आशीर्वादपुण्यात पावसाला सुरुवातभर पावसात ढोल ताशा पथकाकडून वादन.- नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात - मंत्री गिरीश महाजांच्या उपस्थित विसर्जन मिरवणुकीला श्रीगणेशा - पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणरायाला दिला जातोय निरोप - विसर्जन मिरवणुकीला शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती - नाशिक मनपाच्या पहिल्या मानाच्या श्रीगणेशाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात* ढोलाच्या तालावर नाचणाऱ्या पपेटने वेधले लक्ष.गिरगाव चौपाटीवरती घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गिरगाव चौपाटी वरती पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. एक हजाराहून अधिक पोलीस गिरगाव चौपाटीवरती तैनात आहेत..लालबागच्या राजावर फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले आहेत..मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीसमोर लेझीम वादन सुरु आहे. लहान मुलांकडून लेझीम वादन केलं जात आहे. वादनाने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. बेलबाग चौकातही लहान मुलांकडून लेझीम वादन सुरु आहे..रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61 सार्वजनिक तर 36 हजार 405 घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी पोलिसांसह सरकार यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दुपारी चार नंतर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात विसर्जनाला सुरुवात होईल. दरम्यान नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढाव्यात. कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असा आवाहन पोलिसांनी केले आहे..पोलिसांकडून गुरुजी तालीम गणपतीची आरतीमानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात दाखललक्ष्मी रोड वर मार्गस्थ होण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून गणपती ची आरतीगुरुजी तालीम गणपती ची मूर्ती आकर्षक फुलांच्या रथात विराजमान.बेलबाग चौकात अवतरले बाल हनुमानएक गोंडस बाळाने हनुमानाची वेशभूषा परिधान करून विसर्जन मिरवणुकीला उपस्थिती लावलीवडिलांच्या खांद्यावर बसून या बाल हनुमानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं.गणेश गल्लीच्या गणपती विसर्जन मिऱवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीला तुफान गर्दी बघायला मिळते आहे. . पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणूक निघाली आहे..गिरगाव चौपाटीवरती घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. गिरगाव चौपाटी वरती पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. .लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा जोरही कायम आहे..पुणे मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा मंडई चौकात आला पोस्टमन आता फक्त आठवणीतच पोस्टमनच ढोल पथक एक वेगळी थीम.कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या इराणी खण इतर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरातल्या विविध मंडळांच्या गणेश मूर्ती इराणी खणीत पारंपरिक पद्धतीने विसर्जित करण्यात येत आहेत.पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थपुण्याचे ग्राम देवता असलेले तांबडी जोगेश्वरी पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात बेलबाग चौकातून पुढे रवाना.खरोशी गावातील पारंपारिक गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. .तुळशीबाग गणपती मिरवणूक टिळक पुतळ्याजवळ दाखल झाली आहे..छत्रपती संभाजी नगरचे ग्रामदैवत संस्थान गणपतीचे आरती झाल्यानंतर शहरातील गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. या आरतीला पालकमंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह सगळे आमदार आणि अधिकारी उपस्थित आहेत..नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतेय..आयोजकांच्या परिवारात शोक असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने दिला जाणार बाप्पांना निरोपढोल ताशा शिवाय साधेपणाने निघणार मिरवणूक बाप्पांची मूर्ती विसर्जन रथावर विराजमान.टिळक पुतळ्याजवळ चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपती मिरवणुकीसाठी दाखल आहे..मानाचा पहिला गणपती १०.१५ वाजता बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थपुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवातमानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ.बेलबाग चौकात विघ्नहर्ता ढोल ताशा पथकाकडून तांबडी जोगेश्वरी मंडळासमोर वादनपारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून वादनहत्तीची प्रतिकृती आणली असून त्यावर छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा पुतळा. शनिवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास ही घटना घडली असल्याची पोलिसांची माहितीचंद्रा वजणदार असे मृत मुलीचे नाव असून या दुर्घटनेत शैलू वजणदार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेतदोन्ही मुले लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध असलेल्या रस्त्याच्या कडेला झोपले असतानाअज्ञात व्यक्तीने त्याची गाडी मुलांवर घालून कोणतीही वैद्यकिय मदत न देता तिथून निघून गेलायाप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 106, 125(इ), 281, 184,187 (बी.एन.एस) 2023 भा न्या सं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताल ढोल पथकाकडून बेलबाग चौकात सादरीकरणमानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळासमोर ताल ढोल पथकाचे वादनपथकाकडून अनोखी कलाकृती आणली गेली आहे.कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात पहिल्या मानाच्या गणपतीने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात तुकाराम माळी मंडळाचा मानाचा गणपती ची विसर्जन मिरवणूक. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीस प्रारंभ. .टिळक पुतळा मंडई परिसरात ढोल वाजण्यास बंदी असतानाही गुरुजी तालीम यांनी ढोल वादन केलं.मानाचा पहिला गणपती १०.१५ वाजता बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थपुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवातमानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ.मुंबई पोलिसांनी ट्विटवरुन हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. भक्तांना महत्त्वाचा सूचना दिल्या आहेत. आज गिरगांव चौपाटी येथे गणेश विसर्जनाकरिता येणाऱ्या भाविकांना महत्वाच्या सूचना! कर्तव्यावरील पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा, मदतीकरिता बंदोबस्तावरील पोलिस, चौपाटीवरील पोलिस नियंत्रण कक्ष किंवा पोलिस हेल्पलाईन १०० / ११२ /१०३ यावर संपर्क करा..कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. .बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, मुंबईसह ठाण्यात देखील मुसळधार पाऊस बरसत आहे. . पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, मानाचे गणपती मार्गस्थ, गणेश भक्तांचा उत्साह.मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीत पावसानेही हजेरी लावली आहे. मात्र, तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम आहे..पुण्यातील मानाच्या तिन्ही गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे..लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा जपणारा पाचवा मानाचा केसरीवाडा गणपती… देशभक्ती, परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारी केसरीवाडा विसर्जन मिरवणुकीची तयारी झालीय.राष्ट्रीय कला अकादमी कडून बेलबाग चौकात भव्य रांगोळीदर वर्षी बेलबाग चौकात मानाच्या गणपती समोर रांगोळ्या काढल्या जातातरांगोळीतून सामाजिक संदेश देण्यात आला आहेमुख्य मिरवणुकीला ९.३० वाजता सुरुवात होणार.- कुठेही गालबोट न लागू देता मिरवणुक पार पाडावी- बाप्पा ला मागितलं की तुमच्या मनात जे आहे ते व्हावं .मानाचा दुसरा गणपती तांबडे जोगेश्वरी या ठिकाणी विष्णू नाद पथकाच्या वतीने शंख वादन.पुण्यातील पहिला मानाच कसबा पेठ गणपतीची मिरवणूक थोड्याच वेळा सुरु होणार आहेत. गणपकी विसर्जनासाठी पालखीमध्ये विराजमान झाला आहे..तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरवात होणार असुन ढोल-ताशांचा दणदणाट, तर महिलांच्या ओव्या, भजनी मंडळींचा गजर आणि नऊवारी साडीतुन महिलांचे पथक प्रमुख आकर्षक रहाणार असुन बाप्पाची मिरवणूक हि पारंपरिक दिंडी पद्धतीची मिरवणूक या गणपतीची खास परंपरा आहे..पुण्यात सकाळी ९ वाजता गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून त्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..लालबागच्या राजाची उत्तर पूजा सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. त्या नंतर लालबागच्या राजाची आरती होईल. स्वरांजली बँड पथक द्वारे मानवंदन देण्यात येईल आणि विसर्जन मिरवणूक सुरुवात होईल. तरुणाई मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने हजर आहेत. दोन ते तीन तास लालबागच्या राजाची मिरवणूक ही मार्केट परिसरात असेल..१० दिवसांच्या उत्सवात फक्त देशातील नव्हे तर परदेशातून सुद्धा भाविक आले होतेसंध्याकाळी ४ वाजता बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईलयंदा राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला दर्जा मिळाल्यामुळे आनंद आहेअशी प्रतिक्रिया दगडूशेठ गणपती मंडळाचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली..उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातअजित पवारांच्या हस्ते मुख्य मंदिरात होणार पूजा आणि आरतीथोड्याच वेळात दगडूशेठ बाप्पा मुख्य मंदिरातील येणारअजित पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार देखील दगडूशेठ मंदिरातअजित पवार सपत्नीक करणार दगडूशेठ बाप्पांची आरती.श्रीमंत दगडूशेठ गणपती उत्सव मंडपातून मूळ मंदिरात मार्गस्थ होणारकेरळच्या पद्मनाभ मंदिराच्या प्रतिकृतीतून दगडूशेठ मूळ मंदिरात होणार विराजमानउत्सव मंडपातून आरती झाल्यावर बाप्पा मंदिराच्या दिशेने प्रस्थान ठेवणारसंध्याकाळी ४ वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवातउत्सव मंडपात दगडूशेठ गणपती ची आरती सुरू.पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूमसार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पासह घागरोघरी विराजमान असलेल्या बाप्पाचे आज विसर्जनपुण्यात मानाचे गणपतींसह दगडूशेठ गणपती तर मुंबईत लालबागच्या राजाची भव्य मिरवणूकपुण्यात सकाळी ९.३० वाजता मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवातपुण्यातील मुठा नदीवर विसर्जन हौदावर तयारी पूर्णपुणे, मुंबईत मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा बंदोबस्त.'मुंबईचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी चरणस्पर्श शुक्रवार सप्टेंबर रोजी मध्यरात्री ठीक १२:०० वाजता बंद करण्यात आले. त्यानंतर, शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता 'मुंबईचा राजा'ची विसर्जन आरती केली जाईल आणि मुंबईच्या पहिल्या मानाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल..राजेशाही मिरवणुकीला शनिवारी १० वाजता सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईचा राजा अशी ओळख असलेला गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला शनिवारी ८ वाजता सुरुवात होणार आहे. मुंबईतील अनेक गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल २४ तास चालते. बाप्पाचं मोहक रुप पाहण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी होते. अनेक गणपती बाप्पांची उत्तरपूजा सकाळी पार पडते. त्यानंतर आरती करत विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होते. ढोल-ताशांचा गजरात, गुलाल उधळत बाप्पाला निरोप दिला जातो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.