Artificial jewellery esakal
प्रत्येक महिलेला दागिने घालायला खूप आवडतात. सध्या आर्टिफिशियल ज्वेलरी खूप ट्रेण्डमध्ये आहेत. यात अनेक हटके डिझाइन्स आहेत, जे एक सुंदर लूक देतात.
परंतु आर्टिफिशियल ज्वेलरी थोडे लवकर काळे पडतात आणि त्याची चमक पूर्णपणे कमी होते. आर्टिफिशियल ज्वेलरीही काळे पडण्यापासून रोखता येतात. आर्टिफिशियल ज्वेलरी स्टोअर करण्याचे काही ट्रिक्स आहेत. चला पाहूयात.
आर्टिफिशियल ज्वेलरी नेहमी सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून वेगळे ठेवा. ते त्या दागिंन्याजवळ ठेवल्यास तुमचे आर्टिफिशियल ज्वेलरी लवकर काळे होतील.आर्टिफिशियल ज्वेलरी ठेवण्यापूर्वी चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. दागिन्यांमध्ये ओलावा किंवा दुर्गंध राहिली तर ती लवकर काळी होईल.आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी भांडी धुण्याचे डिटर्जंट कोमट पाण्यात ठेवा. त्यात दागिने भिजवून घ्या आणि नंतर सॉफ्ट टूथब्रशने स्वच्छ करा.दागिन्यातील ओलावा घालवण्यासाठी तुम्ही सिलिका पॅकेट्स ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवू शकता. यामुळे दागिन्यांमधील सर्व ओलावा नाहीसा होईल.आर्टिफिशियल ज्वेलरीचा बॉक्स थंड जागी ठेवा. यामुळे त्यावर ओलावा राहणार नाही आणि दागिनेही काळे होणार नाहीत.
आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये पॉलिशही करता येते. जर तुमचा कोणतेही दागिने काळे पडले असेल तर तुम्ही त्याला पॉलिश करून घेऊ शकता.तुमच्या दागिन्यांचा रंग निघून गेला असेल, तर तुम्ही त्याला पॉलिश करून घ्या. इतर दागिन्यांसाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.