फोटोग्राफी

सिंहगड रस्ता परिसरात पौराणिक देखाव्यांवर भर

सकाळ डिजिटल टीम
पानमळा - नवजवान मित्र मंडळाने केलेली काल्पनिक मंदिराची सजावट.

सिंहगड रस्ता - ऐतिहासिक घटनांना उजाळा देत सिंहगड रस्ता परिसरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी पौराणिक देखावे सादर केले आहेत. ‘गणेशोत्सव हे एक कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ’ ही परंपरा सिंहगड रस्ता परिसराने यंदाही कायम ठेवली आहे. बहुतांश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा आयोजित करण्यावर भर दिला आहे. तसेच सोसायटी पातळीवरदेखील लहान मुलांच्या आणि महिलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. अनेक मंडळांनी सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरबाधित कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

माणिक बाग येथील तानाजी तरुण मित्र मंडळाने ‘भक्त प्रल्हाद’ हा पौराणिक हलता देखावा सादर केला आहे. श्रीमंतयोगी मित्र मंडळाने ‘खानाची फजिती’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. इंगळे गुरुदत्त मित्र मंडळ तुळजाभवानी मंडपाची कलाकृती सादर केली आहे, तर चार इंची चौकातील विक्रम मित्र मंडळाचा साईबाबांच्या वेशातील श्रीगणेश लक्षवेधी ठरला आहे. सायंकाळनंतर देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उत्तरोत्तर वाढताना दिसत आहे, तर मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला आहे. 

सनसिटी सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रम
आनंदनगर परिसरातील सनसिटी सोसायटीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. अनेक स्पर्धांमधून सोसायटीला आदर्श गणेशोत्सवाची पारितोषिके मिळाली आहेत. यंदा विविध गुणदर्शनांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सोसायटीतील ३५ महिला आणि पुरुषांनी मिळून ‘अतुल्य भारत’ हा नृत्याचा प्रकार सादर केला, तसेच सोसायटीतील सत्तर लहान मुलामुलींनी रचलेले लेझीम नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. 
यानिमित्ताने सोसायटीतील सभासदांसाठी आनंद मेळावा आयोजित केला होता. परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती घेण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई आणि पारंपरिक ढोल ताशांचे वादन होऊन गौरी विसर्जनच्या दिवशी सोसायटीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वेशभूषेत संपन्न झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT