फोटोग्राफी

सामाजिक रॅम्प वॉक

सकाळ डिजिटल टीम
social causes ramp walk in mumbai

मुंबईत एनएससीआय क्‍लबने कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (सीपीएए)बरोबर "फेव्हिकॉल केअरिंग विथ स्टाईल' या 12 व्या फॅशन शोमध्ये ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या वरुण धवन आणि आलिया भट यांच्यासह शो स्टॉपर म्हणून अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी शानदार रॅम्प वॉक केला. अमिताभ बच्चन यांनी सीपीएएसाठी 11 लाख रुपये इतकी मोठी रक्कम देऊ केली. समाजाला योगदान देण्यासाठी इच्छुक असलेले अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले की, परोपकारी सेवा संस्था या दानावर चालतात. तुम्ही जितके योगदान यात देत आहात, तितकेच योगदान देण्यासाठी आम्ही आज हातात हात घेऊन येथे सज्ज आहोत. कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त लहान मूल पाहणे फारच त्रासदायक आहे आणि आपल्या योगदानामुळे समाजातील या विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने आणि आरोग्यदायी जगता येणे शक्‍य होणार आहे. 
या शोमधून उभा करण्यात आलेला निधी कर्करोग पेशंट्‌स एड असोसिएशन (सीपीएए)तर्फे मुलांच्या रक्ताच्या कर्करोगावर उपचारानिमित्त सोपवण्यात येईल. अबू जानी आणि संदीप घोसला यांचा मित्र परिवार, सुझान खान आणि सोनाली बेंद्रे यांनीही जागरूकता वाढवण्यासाठी या कार्यक्रमात रॅम्प वॉक केला. या शोला आस्क ग्रुप, क्‍लब महिंद्रा, फॉर एव्हर मार्क आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया आदींचा पाठिंबा लाभला. अबू जानी आणि संदीप खोसला या वेळी म्हणाले की, "आमची सृजनशीलता समाजातील चांगल्या कामासाठी आम्हाला वापरता येत आहे. याचा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होत आहे. 

(छायाचित्रे - प्रशांत चव्हाण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT