जपान देश हा लोकसंख्येसाठी तसेच नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. जपान आणखी एका कारणामुळे लोकप्रिय आहे. ते म्हणजे इथले सुंदर तलाव! या तलावांची सुंदरता पाहून प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभूती मिळते. esakal
कावागुची सरोवर- हे सरोवर 'फुजी माउंट'वर आहे आणि जागतिक वारसा म्हणून ओळखले जाते. हा सरोवर जपानमधील सर्वात प्रसिद्ध तलावांपैकी एक आहे. या सरोवराभोवती तीन बाजूंनी डोंगराच्या रांगांनी वेढलेले आहे आणि चौथ्या बाजूस फूजी पर्वत आहे. बिवा सरोवर हा जपानमधील सर्वात मोठा तलाव आहे. जो कासुमिगौरा तलावाच्या आधी आहे आणि लाखो वर्षांपासून आहे असे म्हटले जाते. बिवा सरोवर जपानच्या शिगा प्रांतात आहे आणि आजूबाजूला बरीच छोटी शहरे आहेत. बिवा प्रत्यक्षात एक वाद्य यंत्र आहे आणि सरोवर हे वाद्याच्या आकारासारखे आहे, म्हणूनच कदाचित त्याला बिवा लेक म्हटले जाते.कासुमिगौरा सरोवर बिवा सरोवर नंतर कासुमिगौरा हे दुसरे सर्वात मोठे तलाव आहे. जरी हा तलाव मासेमारी उद्योगांद्वारे वापरला जात असला, तरी आता ते पर्यटनस्थळांचे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. यमनका सरोवर हे फुजी माउंट वर स्थित पाच तलावांपैकी एक आहे. तुम्ही सायकल घेऊन तलावावर फिरायला जाऊ शकता किंवा विंडसर्फिंग, वॉटर-स्कीइंग, पोहणे, फिशिंग किंवा बोटिंग करू शकताचुझेंजी तलाव जपानमधील हा एक प्रमुख तलाव आहे. शहराच्या अगदी वरच्या बाजूला डोंगरांमध्ये हा सरोवर आहे. जर आपण उन्हाळ्यात भेट दिली तर सुखद अनुभव येईल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.