Know the secret of Actress Madhuri Dixit's Beauty
Know the secret of Actress Madhuri Dixit's Beauty  esakal
फोटोग्राफी

माधुरी पन्नाशीतही दिसते तरूण ! तुम्हालाही दिसायचंय ? मग फॉलो करा या टिप्स

सकाळ ऑनलाईन टीम

खरं तर प्रत्येकाला ज्याचं त्याचं बाह्य सौंदर्य प्रिय असतं.महिलांबद्दल बोलायचं झालं तर आगदी केस झळतीपासून तर चेहऱ्याच्या पिंपल्सपर्यंतची काळजी त्यांना सतत लागून असते.त्यातही या धकाधकीच्या आयुष्यात स्वत:ची काळजी घेत स्वत:ला मेंटेन ठेवणं प्रत्येकालाच जमत नसल्याने मात्र अनेक महिलांना कमी वयातच अनेक त्रासांनी ग्रासले आहे.

माधुरी दिक्षित वयाच्या पन्नाशीनंतरही तेवढीच सुंदर आणि फिट कशी काय दिसते असा प्रश्न अनेकांना पडला असेल.आज आपण त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
माधुरी स्वत:ला फिट अँड ब्युटिफुल ठेवण्यासाठी फार काही करत नाही.अर्थात सगळ्या स्त्रियांना जमू शकेल असंच काहीसं माधुरी करते.ते पुढे तुम्हाला कळेलच.
माधुरी इतर अभिनेत्रींसारखं फार वर्क आऊट करत नाही.आठवड्यातून ४-५ वेळा माधुरी कत्थकचा सराव करते आणि काहीसं लाईट वर्क आऊट करते.तिच्या मते कत्थकमुळे शरीराच्या सर्वच स्नायूंचा व्यायाम होतो.त्यामुळे आपण फिट असतो असंही तिला वाटतं.
माधुरी कमी तेल आणि कमी फॅटयुक्त पदार्थ खाण्यास प्राधान्य देते.तिचा रोजचा खाण्याचा नित्यक्रम ठरलेला आहे.तुम्हीही तो सहज फॉलो करू शकता.
आतापर्यंत आपण माधुरीच्या फिटनेस टीप्स जाणून घेतल्या आता वळूया डाएटकडे.माधुरी तिच्या डाएटमधे जास्तीत जास्त फळभाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश असतो.माधुरी महाराष्ट्रीयन असल्यामुळे तिला महाराष्ट्रीयन जेवण फार आवडते.
माधुरी सकाळी ओट्स किंवा ब्रेडसोबत ३ अंडी आणि एक कप चहा घेते.मध्यंतरी ती नट्स किंवा दही आणि फळं खाते.तसेच लंचमधे ती चिकन,भाजी आणि चपाती घेते.संध्याकाळी ती एखादं अंडं आणि कपभर चहा घेते.
माधुरीच्या रात्रीच्या जेवणात ग्रील्ड फिश किंवा सलाद आणि चिकन असतं.माधुरीसाठी नारळाचं पाणी म्हणजे अत्यावश्यक.त्यामुळे तिची स्किन डिहायड्रेट होत नाही.तिचा चेहराही कायम टवटवित दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT