"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

मुलगी देबोलिना त्यांच्या बारानगर अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. तीन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली, आई डेबीने तिच्या मुलीच्या मृतदेहासोबत ३ दिवस घालवले.
kolkata mother slept with daughter dead body for 3 days
kolkata mother slept with daughter dead body for 3 daysesakal

पश्चिम बंगालमधून धक्कादायक माहिती बातमी समोर आली आहे. कोलकातमध्ये एक आई आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत ३ दिवस राहीली. माझी लाडकी जिवंत आहे असे म्हणत आई तिला जेवायला देखील विचारत होती. मात्र मुलीचा मृत्यू झाला होता. ३ दिवसानंतर जेव्हा मृतदेहाचा दुर्गंध येवू लागला तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. (kolkata mother slept with daughter dead body for 3 days)

महिलेचे नाव डेबी भौमिक आहे. त्याच्या पतीचे नाव देबासिस भौमिक आहे. देबासिस सरकारी कर्मचारी होते. डेबी आपल्या पतीपासून २००६ मध्ये वेगळी झाली होती. त्यानंतर ती तिची मुलगी देबोलिनासोबत टीएन चॅटर्जी स्ट्रीटजवळील बारानगरमधील लालबारी अपार्टमेंटमध्ये राहत होती.

शेजाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी दुपारी त्यांच्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत होती आणि त्यांनी याबाबत विचारणा करण्यासाठी डेबी यांच्या घराचे दार ठोकले.

दरम्यान, डेबीने दार उघडले आणि ती बेडवर पडलेल्या तिच्या मुलीकडे त्यांना घेऊन गेली, मुलगी तेथे विकृत अवस्थेत पडली होती. यावेळी डेबीने शेजाऱ्यांना सांगितले की, गेल्या दिवसापासून तिची मुलगी काही खात नाही आणि तिच्याशी बोलत नाही. हे पाहून आणि ऐकून शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

kolkata mother slept with daughter dead body for 3 days
Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शेजाऱ्यांनी डेबीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तिची मुलगी आता नाही पण डेबीला पटले नाही आणि आपली मुलगी अजून जिवंत असल्याचे सांगत होती. महिलेची अवस्था पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. (kolkata news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेबीच्या मुलीचा ३ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, काही वेळाने डेबीचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेबीला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता. पोलिसांनी डेबीच्या पतीला मृत्यूची माहिती दिली परंतु त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

kolkata mother slept with daughter dead body for 3 days
China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com