know these 12 major jyotirlingas of India esakal
भारतात १२ प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत. या सर्वांचे स्वतःचे महत्त्व आणि वैभव आहे. जाणून घेऊयात कुठे आहेत हे 12 ज्योतिर्लिंग...
सोमनाथ ज्योतिर्लिंग:
सोमनाथ ज्योतिर्लिंग(Somnath Jyotirlinga) हे केवळ भारताचेच नव्हे तर या पृथ्वीचे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर गुजरात राज्याच्या सौराष्ट्र भागात आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग:
घृष्णेश्वर महादेवाचे (Ghrishneshwar Jyotirlinga) प्रसिद्ध मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराजवळ दौलताबादजवळ आहे. याला घृष्णेश्वर किंवा घुष्मेश्वर असेही म्हणतात.रामेश्वरम ज्योतिर्लिंग:
रामेश्वरम ज्योतिर्लिंग (Rameswaram Jyotirlinga)हे तमिळनाडू राज्यात रामनाथपुरम नावाच्या ठिकाणी आहे. भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असण्याबरोबरच हे स्थान हिंदूंच्या चार धामांपैकी एक आहे.नागेश्वर ज्योतिर्लिंग:
नागेश्वर ज्योतिर्लिंग (Nageshwar Jyotirlinga) हे गुजरातच्या बाहेरील द्वारिका येथे आहे. धर्मग्रंथात भगवान शिव हे नागांचे दैवत असून नागेश्वराचा पूर्ण अर्थ नागांचा देव आहे. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग:
श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग (Baidyanath Jyotirlinga) हे सर्व ज्योतिर्लिंगांच्या गणनेत नववे स्थान असल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी भगवान श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे त्या ठिकाणाला वैद्यनाथ धाम म्हणतात . मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग:
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (Mallikarjuna Jyotirlinga) हे आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैल नावाच्या पर्वतावर वसलेले आहे. या मंदिराचे महत्त्व भगवान शंकराच्या कैलास पर्वतासारखेच असल्याचे सांगितले जाते.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग:
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar Jyotirlinga)हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या जवळ आहे. या ज्योतिर्लिंगाच्या सर्वात जवळ ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग:
विश्वनाथ ज्योतिर्लिंग (Kashi Vishwanath Jyotirlinga) हे भारताच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उत्तर प्रदेशातील काशी नावाच्या ठिकाणी हे ठिकाण आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग:
भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar Jyotirlinga) हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री नावाच्या डोंगरावर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोतेश्वर महादेव म्हणूनही ओळखले जाते.केदारनाथ ज्योतिर्लिंग:
भगवान शंकराच्या १२ प्रमुख ज्योतिर्लिंगांमध्ये केदारनाथ ज्योतिर्लिंग (Kedarnath Jyotirlinga) देखील येते. हे उत्तराखंडमध्ये स्थित आहे. बद्रीनाथच्या वाटेवर बाबा केदारनाथचे मंदिर आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग:
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (Omkareshwar Jyotirlinga) मध्य प्रदेशातील इंदूर या प्रसिद्ध शहराजवळ आहे. हे ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी नर्मदा नदी वाहते आणि टेकडीभोवती नदी वाहते.महाकालेश्वर ज्योतिर्लिंग:
मध्य प्रदेशची धार्मिक राजधानी म्हणल्या जाणाऱ्या उज्जैन शहरात हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (Mahakaleshwar Jyotirlinga) आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.