नागपूर : शिंगाडे (Horns) हे त्रिकोणाच्या आकाराचे फळ आहे. हे एक जलयुक्त फळ आहे. या वनस्पतीमध्ये त्रिकोणी पाने आणि पांढरे फुले असतात. तलावांमध्ये हे लागत असतात. शरीराला मॅॅगनीजची आवश्यक असते. शिंगाडे हे शरीराची मॅगनीज शोषण्याची क्षमता वाढवते (Horns increase the absorption capacity of manganese). म्हातारपणात होणारे बहुतेक रोग केवळ मॅगनीजच्या अभावामुळे होतात. ज्या स्त्रियांची गर्भधारणा कधीही पूर्ण होत नाही तसेच गर्भपात होण्याची भीती असते अशा स्त्रियांनी शिंगाडे खायला पाहिजे. हे पळा पुरुषांसाठीही फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया या पळाविषयी... (Make-horn-dough-included-in-the-diet-These-are-the-benefits)
अँटीऑक्सिडेंटने भरपूर - शिंगाड्याच्या कणिक कॉलेस्ट्रॉल नसते. हे आवश्यक पोषक तत्त्व आणि विटॅमीनने भरपूर असते. तसेच शिंगाडे अँटीऑक्सिडेंट वाढविण्याचे काम करते. शिंगाड्याची कणिक वीटॅमीन बी ६, पोटॅशिअम, तांबा, आयोडीन आदींनी भरलेले असते.पचनक्रिया सुधारते - शिंगाड्याची कणिक जेवण पचवण्यासाठी मदत करते. या कणिकचा जेवणात समावेश केल्याने ॲसिडीटीची समस्या दूर होण्यास मदत होते. ऊर्जा प्रदान करते - शिंगाड्याची कणिक उपवासाच्या काळात वापरली जाते. मात्र, याचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. शिंगाडे आयरन, कॅल्शिअम, जिंक आणि फॉस्फरस वाढवण्यास मदत करतो.हाडांसाठी उपयुक्त - या कणिकमध्ये असलेले कॅल्शिअम हाडांना मजबूत करण्यासाठी मदत करते. याचे सेवण केल्याने हाडांशी संबंधित अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.वजन करते नियंत्रित - शिंगाड्याची कणिक फायबर युक्त असते. फायबर पचवण्यासाठी फार वेळ लागतो. यामुळे शिंगाडे खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे जास्त भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.ब्लडप्रेशर करते नियंत्रित - शिंगाड्याची कणिक पोटॅशिअम स्ट्रोक आणि उच्च रक्तचापची समस्या कमी करण्यास मदत करते. हे हृदयरोगाशी संबंधित आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.