मदनसुरी (ता.निलंगा, जि.लातूर) येथील तेरणा नदीचे विदारक चित्र मदनसुरी येथील कोतापुरे फोटो स्टुडिओने टिपले आहे.
Terna River Flood Latur
मराठवाड्यात पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सद्यःस्थितीत प्रत्येक जिल्ह्यातील पिके पाण्यात गेली आहेत. मोठी मनुष्यहानी झाली आहे. अनेक ठिकाणी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे येलदरी, दुधना, माजलगाव असेल किंवा जायकवाडी धरण प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आता तातडीने नुकसानग्रस्त नागरिकांना मदत देण्याची गरज आहे.
औंढा नागनाथ (जि.हिंगोली) - पूर्णा नदीला पूर आल्याने औंढा-औरंगाबाद महामार्ग बंद झाला आहे. पिंपरखेड ( ता. हदगाव, जि.नांदेड) महसूल मंडळातील चेंडकापुर शेतशिवारात कयाधु नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने दोन दिवसातून चेडकांपुर-बरडशेवाळा संपर्क तुटला आहे.
पोहरेगाव (ता.रेणापूर, जि.लातूर) - मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या कुटुंबाला भारतीय हवाई दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे.पैठण (जि.औरंगाबाद) - जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आली आहेत.जुने कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) येथे काल झालेल्या अतिवृष्टीने 15 घरे पाण्यात गेली असून या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त स्थळाची पाहणी करण्यास प्रशासनाकडून कोणीच फिरकले नाहीत.औरंगाबाद - वळदगाव येथे वाळूज एमआयडीसीत जाणारा कामगार खाम नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला आहे.सेलू (जि.परभणी ) - लोअर दुधना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दुधना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.बीड - परळी वैजीनाथ तालुक्यातील पांगरी येथे तब्बल 10 एकर पिकात कमरा इतके पाणी साचले आहे.बीड : वाण नदीला आलेल्या पुरामुळे पांगरी येथे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बीड : तटबोरगाव, अकोला, धानोरा (खु) देवळा भागात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मळगीवाडी (जि.उस्मानाबाद) : गेल्या आठवड्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या सोयाबीनचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.येलदरी (ता.जिंतूर, जि.परभणी) धरणातून पाणी सोडण्यातआले आहे. पाणी पाहण्यासाठी मोठ्यासंख्येने नागरिकांना गर्दी केली होती.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.