rain sangli
rain sangli esakal
फोटोग्राफी

PHOTO - सांगलीला वळीवाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

अजित झळके

जिल्ह्यात काल सायंकाळी 'ग्रॅंड एंट्री' केलेल्या वळीवाने रात्री तळ ठोकला आणि आज दिवसभर धिंगाणा घातला. वळीवाने धुवून काढले. त्याने उन्हाळा वाहून गेलाच, शिवाय मे महिन्यात ओढे भरून वहायला लागले. (Rain Update Sangli) सांगलीतील पावसाचे छायाचित्र टिपलेत 'सकाळ'चे उल्हास देवळेकर यांनी...

सांगली शहरातील विस्तारीत भागात तळी साचली, दलदल झाली, चौकांत पाणी साचले. बाजार कोलमडला.
सोबतच, यंदाच्या पावसाळ्यात आणखी मोठे संकट येईल की काय, या भितीने नदीकाठाला घाम फोडला.
गुरुवार, शुक्रवार पाऊस पडणार हा अनुमान होताच, मात्र असा अजब पाऊस पडेल, अशी अपेक्षाच नव्हती.
मे महिन्यात वळीव येतोच, तास-दोन तास ढगांचा गडगडात होतो, वीजा चमकतात, पाणी पाणी होते आणि तो निघून जातो.
यावर्षी पावसाचा मूड वेगळा आहे. सलग दोन दिवस मुक्काम ठोकून तो कोसळत आहे. हस्त नक्षत्रात ज्या पद्धतीने तो तळ ठोकतो, तशीच अवस्था असल्याचे जुने जाणकार सांगत आहेत.
मे महिन्यात वळवाचा पाऊस अशा पद्धतीने पडताना आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, ही ज्येष्ठांची प्रतिक्रिया बोलकी आहे.
जत तालुक्यात अतिवृष्टीसारखी परिस्थिती झाली आहे. ओढ्यांचे पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक रस्ते काहीकाळ बंद पडले होते.  
जतमध्ये अतिवृष्टी, सांगली शहरांत मुसळधार आणि त्याचवेळी जिल्हाभर एकावेळी वळीवाची हजेरी, असे अजब रसायन पहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : करकरेंविषयी वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा; शशी थरूरांची मागणी

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT