Ram Navami 2023
Ram Navami 2023 esakal
फोटोग्राफी

Ram Navami 2023 : लखलखत्या दिव्यांची रांगोळी अन् अप्रतिम देखावे, रामनवमीला असं सजतं नागपूर

साक्षी राऊत

Ram Navami 2023 : रामनवमी भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रामनवमीच्या दिवशी भगवान राम वनवासातून अयोध्येत परतले होते. त्यांच्या घरी येण्याचा आनंद हा दिवाळीच्या सणापेक्षाही जोरदार साजरा करण्यात आला होता. आणि म्हणूनच रामनवमीला दुसरी दिवाळीच मानलं जातं. नागपूरला रामनवमीची खास तयारी तुम्हाला दरवर्षी बघायला मिळेल. रामनवमीला राम झूला परिसर असा सजवण्यात येतो जणू संपूर्ण नागपूर मिळून दुसरी दिवाळी साजरी करतेय असं तुम्हाला जाणवेल.

रामनवमीच्या दिवशी या परिसरात संपूर्ण दिव्यांची रांगोळी काढलेली असते,
ही रांगोळी बघण्यासाठी संपूर्ण नागपूरकरांची गर्दी तुम्हाला या भागात जमलेली दिसून येईल.
तसेच प्रचंड मोठी शोभा यात्रा देखील या दिवशी असते. आणि या यात्रेत तुम्हाला दरवर्षी वेगवेगळे देखावेसुद्धा बघायला मिळतील.
रामनवमीला दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण नागपूर तेजमय होतं. बघण्यासाठीसुद्धा हे दृष्य अगदी कायम डोळ्यांत साठवून ठेवावं असंच वाटतं.
कोरोना काळामुळे मात्र मागील दोन-तीन वर्षात ही शोभायात्रा काढण्यात आली नव्हती. तरी दिव्यांनी राम झुला परिसर सजवण्यात यायचा.
यंदा मात्र कुठलेच निर्बंध नसल्याने निर्बंधमुक्त रामनवमी नागपूरकर साजरी करणार आहेत. तसेच शोभा यात्रेचीही जोरदार तयारी नागपूरकरांनी केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT