यंदाच्या हिवाळ्यात (Winter) निसर्गाच्या जवळ जायचं आहे? तेही हटके अंदाजात? मग तुम्ही रोप वेचा पर्याय निवडू शकता. भारतातल्या अनेक ठिकाणचे रोप वे प्रसिद्ध (Famous in many places in India) आहेत. आसपासचा सुंदर निसर्ग, सूर्यास्त यांचे रोप वेमधून उंचावरून दर्शन घडते. ट्रेकिंग, कार किंवा बाईक राईड हे निसर्गदर्शनाचे काही पर्याय असले तरी रोप वे (Ropeway) काहीतरी वेगळं देऊ न जातो. त्यातच थोडं धाडस केल्याचं समाधानही लाभतं.हिमालयाचा सुंदर नजारा तुम्हाला आकर्षित करेल. या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारचे धाडसी क्रिडाप्रकारही करू शकता. इथल्या रोप वेने माउंट फट्रपर्यत जाऊ शकता.
दार्जिलिंग हे निसर्गरम्य ठिकाण मानले जाते. इथले घनदाट जंगल, उंच पर्वतरांगा, चहाचे मळे, धबधबे आणि नद्या बघून मन मोहून जाते. हे सगळे उंचीवरून पाहण्याची मजा काही औरच. येथील रोप वे मधून हिमालयाचे सुंदर दर्शन घडते.काश्मीरमधले निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर गुलर्मगला जायला हवे. गुलर्मगचा रोप वे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उंच रोप वे आहे. या रोप वे मधून काश्मीर डोळ्यात साठवून घेता येते.महाराष्ट्रातल्या रायगडमधला रोप वेही प्रसिद्ध आहे. या रोप वेच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर जाता येते. हा रोप वे तुमच्या बजेटमध्ये बसू शकतो. यासोबतच रायगडच्या आसपासची पर्यटन स्थळंही तुम्ही पाहू शकता.उत्तराखंडमधल्या देहरादूनमधले मसुरी हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. इथल्या गण हिलमध्ये रोप वे आहे. या रोप वे मधून मसुरी खूप छान दिसते. मसुरीमधली इतर ठिकाणंही तुम्ही बघू शकता.हिमालयाचा सुंदर नजारा तुम्हाला आकर्षित करेल. या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारचे धाडसी क्रिडाप्रकारही करू शकता. इथल्या रोप वेने माउंट फट्रपर्यत जाऊ शकता.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.