taarak mehta ka ooltah chashmah actors unmarried in real life file image
अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा!' या मालिकेमधील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेतील गोकूळधाम सोसायटीमधील जोड्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. पण या मालिकेमधील काही कलाकार असे आहेत जे अजूनही अविवाहीत आहेत. अशाच काही कलाकरांची आपण माहिती घेऊयात..
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधील अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहता अजूनही अविवाहीत आहे. काही दिवसांपुर्वी नेहाने ही मालिका सोडली. मालिकेत डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कलाकार निर्मल सोनी हे 42 वर्षाचे आहेत. निर्मल हे देखील अविवाहीत आहेत. 'अय्यर' ही भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे यांचे मालिकेत बबितासोबत लग्न झाले आहे. पण खऱ्या आयुष्यात ४५ वर्षांचे आय्यर हे अजूनही अविवाहीत आहेत.मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. ३३ वर्षांच्या मुनमुनने अजूनही लग्न केले नाही.मालिकेमधील नेहमी हसमुख असणारा आणि कायम दुसऱ्यांना हसवणारा रोशन सिंह सोढी त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. गुरुचरण सिंह याने सोढीची भूमिका साकारली आहे. गुरूचरण खऱ्या आयुष्यात अविवाहीत आहे.मालिकेत नेहमी हसत खेळत राहणारी आणि बाघाच्या प्रेमात असणारी 'बावरी' ही भूमिका अभिनेत्री मोनिका भदोरियाने केली आहे. ती आजही अविवाहीत आहे. 2018 मध्ये मोनिकाने मालिका सोडली. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.