Virat Kohli Controversial Press Conference
Virat Kohli Controversial Press Conference esakal
फोटोग्राफी

सटकलेल्या विराटने या 5 पत्रकार परिषदेत काढला होता जाळ

सकाळ डिजिटल टीम

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 100 वी कसोटी (Virat Kohli 100th Test) खेळणार आहे. त्याने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विराट कोहलीने दरम्यानच्या काळात जगातील एक सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून नावलौकिक कमावले. याचबरोबर विराट कोहली मैदानावर एक आक्रमक खेळाडू म्हणूनही ओळखला गेला. त्याने ही आक्रमकता कधी कधी पत्रकार परिषदेतही आणली. त्यामुळे त्याच्या काही पत्रकार परिषद या वादग्रस्त ठरल्या. विराट 4 मार्चला आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. भारताकडून 100 वा कसोटी सामना खेळणारा तो 12 वा खेळाडू ठरणार आहे. याचे निमित्त साधून विराट कोहलीच्या वादग्रस्त ठरलेल्या पाच पत्रकार परिषदांचा आढावा घेणार आहोत.(Virat Kohli Controversial Press Conference)

2014 ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनबरोबरची जुगलबंदी पत्रकार परिषदेतही आणली 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कोसटी मालिकेत एक मोठा बदल घडला होता. महेंद्रसिंह धोनीने कसोटीचे नेतृत्व सोडले होते. विराट कोहलीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. या दौऱ्यात विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगले होते. त्यातच तो आता कर्णधार झाला होता. याच कसोटीत मिचेल जॉन्सनने विराट कोहलीला अनावधानाने चेंडू फेकून मारला होता. जॉन्सनने माफी देखील मागितली होती. मात्र विराटने हा माफीनामा धुडकावून लावत जॉन्सनला चौकार मारल्यानंतर त्याला डिवचत राहिला. या प्रकरणावर विराट कोहलीने पत्रकार परिषदेतही जाळ काढला. तो म्हणाला की, 'त्याने मला चेंडू फेकून मारल्यानंतर मी खूप वैतागलो होतो. मी त्याला असं करू नको असे सांगितले होते. चेंडू स्टम्पवर मारण्याचा प्रयत्न करत माझ्या शरिरावर मारू नको. तुम्हाला योग्य संदेश देणे गरजेचे असते. मी अनावश्यक बडबड करण्यासाठी मैदानावर जात नाही. हे पूर्ण दिवस सुरू होते. त्यांनी ते मला एक बिघडलेला अपरिपक्व मुलगा म्हणून चिडवत होते. त्यावेळी मी त्यांना तुम्ही माझा तिरस्कार करता हे मला आवडते. मला मैदानावर जशास तसे उत्तर देण्यात काहीच अडचण नाही उलट त्याचा माला फायदा होतोच. मला ऑस्ट्रेलियात खेळायला आवडते कारण ते शांत बसत नाहीत आणि मैदानावर हुज्जत घालायला माझी कोणतीच हरकत नसते.'
2017 ला स्टीव्ह स्मिथच्या चिटिंगचे काढले वाभाडे भारताने मायदेशातील ऑस्ट्रेलिया विरूद्धची कसोटी मालिका दुसरी कसोटी जिंकून बरोबरीत आणली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ विकेटबाबत रिव्ह्यू घेताना पॅव्हेलियनकडून मदत मागत होता. हे पाहिल्यानंतर विराट चांगलाच भडकला होता. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला होता की, 'मी फलंदाजी करताना असा प्रकार दोन वेळा झाला होता. ही बाब मी अंपायरच्या लक्षात देखील आणून दिली होती. आम्ही याबाबत समानाधिकऱ्यांकडेही तक्रार केली आहे. ते गेल्या तीन दिवसांपासून हा प्रकार करत होते हे कुठेतरी थांबणे गरजेचे होते. क्रिकेटच्या मैदानावर वावरताना एक मर्यादा पाळायची असते. विरूद्ध संघाला शिवीगाळ करणे ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र या प्रकराची मैदानावर चिटिंग केलेली मला आवडत नाही.'
2018 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्लेईंग इलेव्हनच्या प्रश्नावर विराटची सटकली विराट कोहलीने 2018 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत चांगलाच भडकला होता. विराटने या कसोटीत 153 धावांची खेळी केली होती. मात्र पत्रकार परिषदेतील एका प्रश्नावर विराटने तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्याने कोणती प्लेईंग इलेव्हन ही बेस्ट असते? असा प्रतिप्रश्न पत्रकाराला केला होता. जर आम्ही हा सामना जिंकला असता तर ही बेस्ट इलेव्हन झाली असती. तू मला सांगतोयस की कोणते बेस्ट प्लेईंग इलेव्हन आहेत आणि आम्ही ती बेस्ट इलेव्हन खेळवायची असेही तो म्हणाला होता. याचबरोबर विराट दक्षिण आफ्रिकेच्या पत्रकारालाही भारतातील खेळपट्ट्यांवरून झाडले होते. तो म्हणाला होता की, 'तुम्ही भारतातील खेळपट्ट्यांबाबत तक्रार करता मात्र आम्ही इथल्या खेळपट्ट्यांबाबत तक्रार करत नाही. केप टाऊनमधील कसोटी देखील तीन दिवसात संपली होती. त्यातील एक दिवस तर वॉश आऊट झाला होता.'
2020 न्यूझीलंड दौरा : वाद निर्माण करायची ही जागा नाही भारताचा 2020 मधील न्यूझीलंड दौरा काही फारसा चांगला गेला नव्हता. भारताने पहिला कसोटी सामना 10 विकेट्सनी गमावला होता. दुसरा कसोटी सामना 7 विकेट्सनी गमावला होता. दुसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत प्रेक्षकांकडे पाहून केलेल्या हावभावावरून विराटला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी विराटने 'तुला काय वाटते मी तेथे काय केले. ते तुलाच शोधायला हवे की तेथे काय झाले. एखादा चांगला प्रश्न विचारा. तुम्हाला जर वाद निर्माण करायचे असतील तर ती ही जागा नाही.' असे उत्तर दिले होते.
कॅप्टन्सीवरून उचलबांगडी झालेल्या विराटने घेतला दादाशीच पंगा विराट कोहलीला 2021 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच एक तगडा झटका बसला होता. त्याला वनडे कॅप्टन्सीपासून हात धुवावा लागला होता. यावेळी त्याने दौऱ्यावर निघण्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत कोणताही आडपडदा न ठेवता सर्व घटनाक्रम सांगत बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीची गोची केली होती. विराटने या पत्रकार परिषदेत मी वर्ल्डकप पूर्वी टी 20 संघाचे नेतृत्व सोडले होते त्यावेळी मला कोणीही नेतृत्व सोडू नको असे म्हणाले नव्हते. माझ्या निर्णयावर कोणाचीही तक्रार नव्हती. सर्वांनी याकडे एक सकारात्मक निर्णय म्हणून पाहिले. त्यावेळी मी कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करू इच्छितो असेही सांगितले होते. माझे बीसीसीआयबरोबरचे संभाषण अगदी स्पष्ट होते.' विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेपूर्वी सौरभ गांगुलीने विराटला मी टी 20 संघाचे नेतृत्व सोडू नको असा वैयक्तिक सल्ला दिला होता असे माध्यमांसमोर जाहीर केले होते. त्यामुळे विराट खरं बोलतोय की सौरभ गांगुली हा संभ्रम निर्माण झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

Accident News : पुण्यात कल्याणीनगर येथे भीषण अपघात, दोघांना चिरडले,अल्पवयीन कारचालक ताब्यात

Sharmistha Raut : "माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे"; घटस्फोटाच्या त्या प्रसंगावर व्यक्त झाली शर्मिष्ठा

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT