The new look Deccan Queen Sakal
Indian Railway: मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनला (Deccan Queen) अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा रंग बदलला आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मध्ये डेक्कन क्वीनचे डबे तयार केले गेले आहेत. तर, नव्या रूपातील डेक्कन क्वीन लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. (The new look Deccan Queen will arrive in Mumbai soon)
भारतीय रेल्वेमध्ये प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ट्रेन असा मान मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला आहे. मुंबई ते पुणे मार्गावर डेक्कन क्वीन 1 जून 1930 साली सुरू करण्यात आली. तेव्हापासून या गाडीला डायनिंग कार आहे. या कारमध्ये आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थाचा आस्वादही घेता येतो. मात्र, रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वेमधील सर्वच एक्सप्रेस या एलएचबी कोच लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ऐतिहासिक डेक्कन क्वीनला एलएचबी कोच लावण्यात येत आहे. एलएचबी कोचमुळे एक्सप्रेसची सुरक्षितता वाढते. या डब्यामुळे एखादा अपघात झाल्यास जिवीतहानी कमी होते, तसेच गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. साधे डबे एलएचबी प्रकारात रुपांतर करताना त्यातील अंतर्गत सजावटीवरही भर दिला जातो. डायनिंग कारच्या खिडक्या मोठ्या स्वरुपात काचेच्या असतील. या कारमध्ये मोकळी जागा बरीच निर्माण करण्यात येणार असून बसण्याची व्यवस्थाही उत्तम असणार आहे.ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा रंग सुद्धा बदलण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने डेक्कन क्वीनसाठी लाल, हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्यांसह 'प्रतिबंधित इम्प्रेरियम' रंगाची छटा निश्चित केली आहे. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) च्या वरिष्ठ अधिकाऱयांनी डेक्कन क्वीनने प्रवास करुन नियमित प्रवाशांशी संवाद साधल्यानंतरच रंग निश्चित करण्यात आला आहे. रेल्वेमध्ये प्रथमच एका ट्रेनचा रंग इतर गाड्यांपेक्षा वेगळा असणार आहे.नवीन डायनिंग कार ही अपघातरोधक असणार आहे. एलएचबी डब्यांमुळे अपघाताची तीव्रता कमी होणार आहे. तर, डायनिंग कार मध्ये 10 टेबल असणार आहेत. यावर 40 प्रवासी बसू शकतील. तसेच नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ प्रवाशांना मिळणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.