वडाळा (सोलापूर ): येथे शनिवारी रात्री पावणे दहा ते अकरा वाजेपर्यंत रानमसले ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले आहे. तसेच पहाटे पर्यंत पावसाची संततधार सुरुच होती. विजांचा लखलखाट आसमंत उजळून गेला होता. गावडी दारफळ येथील पाझर तलाव परिसरात मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आहे. याचे छायाचित्र दयानंद कुंभार यांनी काढले आहेत
उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या गेल्या महिन्यातभरात अधून-मधून पाऊस दमदार बरसला आहे. यामुळे कांदा, सोयाबीन, उडीद, मका, तुर पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस आता मात्र खरीप पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांत मोठे चिंतेचे वातावरण आहे. कांदा, उडीद, सोयाबीन, मुग, मका, भाजीपाला पाण्यातच सडून जात आहे. यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या रानमसले, वडाळा, नान्नज, पडसाळी, कळमण, गावडी दारफळ, वांगी, शेजारील खुनेश्वर, मोरवंची या परिसरात अशीच अवस्था झाली आहे. सध्या रानमसले परिसरात शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ओढे, नाले, विहिरी तुटुंब भरुन वाहत आहेत. कौठाळी-कळमण रोडावरील दरम्यान पुलावर पाणी आल्याने कौठाळी गावचा संपर्क तुटला आहे. तसेच रानमसले- खुनेश्वर, रानमसले-पडसाळी, रानमसले - वांगी रस्त्यावर वांगिरा व डोहिरा ओढा दुथडी भरुन वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रानमसले परिसरात प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. मात्र ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे आतोनात नुकसान झाले आहे. सतत ओल राहिल्याने कांद्याच्या मुळ्या सडू लागल्या आहेत. रानमसले गावतळे तुटुंब भरुन ओसंडून वाहत आहे. तळ्याच्या भरावास मोठ्या पाझर सुटला आहे. यामुळे गावतळ्यास गावतळ्याच्या लगत असणाऱ्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. यामुळे धान्य व संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. याबाबत महसूल विभागाकडून घरांचे व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची व मदतीची मागणी केली आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.