Sahitya Samelan  esakal
जळगाव

Marathi Sahitya Sammelan : साहित्य संस्कृती मंचतर्फे 25, 26 ला साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा

Marathi Sahitya Sammelan : साहित्य संस्कृती मंचच्या वतीने २५ व २६ नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसीय संमेलनात विविध साहित्यिक, काव्यांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. (25 26 Sahitya Samelan organized by Sahitya Sankshatri Manch jalgaon news)

जैन हिल्स येथे शनिवारी (ता.२५) सकाळी ९.३० वा. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी अध्यक्षस्थानी असतील.

खंडव्याचे खासदार ज्ञानेश्‍वर पाटील, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

शनिवारचे सत्र

संमेलनाच्या पहिल्या सत्रात २५ तारखेस सकाळी १२ ते दुपारी १.३० वाजेदरम्यान ‘लेखन ते प्रकाशन- एक बिकट वाट’ या विषयावर परिचर्चा होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत होणाऱ्या कवी संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर असतील, अरुण म्हात्रे सूत्रसंचालन करतील.

तिसऱ्या सत्रात सायं. ६ ते ७.३० या वेळेत कविता ते मिश्‍किली : एक प्रवास हा गाजलेला कार्यक्रम होईल.

रविवारचे सत्र

रविवारी (ता.२६) संमेलनाच्या चौथ्या सत्रात सकाळी ९.३० ते ११ या वेळेत ‘प्रश्‍न एक उत्तर अनेक : खुल्या गप्पा’ हा कार्यक्रम होईल. पाचव्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी १ वा या वेळेत द्वितीय कविसंमेलन होणार आहे. साहित्य प्रेमींनी संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: कामाची बातमी! बकरी ईदमुळे 27 मे की 28 मे? महाराष्ट्रातील बँका नेमक्या कधी बंद राहणार?

Gold Price: सोन्यात ७००, तर चांदीत तब्बल सहा हजारांची घसरण; सराफ बाजारात मोठी उलथापालथ

UP Crime: भाजप नेत्याने महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन बनवला अश्लील व्हिडिओ ; गुन्हा दाखल, पक्षात मोठी फूट

Monsoon Delay India : मान्सून श्रीलंकेतच रेंगाळला, केरळमध्ये 'या' दिवशी धडकणार; महाराष्ट्रातही आगमन लांबणीवर? IMD चा नवा अंदाज समोर

Koyna Dam Water: कोयनेतील ‘महाजनको’चा कोटा संपुष्टात; वीजनिर्मितीवर परिणाम, राज्यात भारनियमनाचे संकट, सातारा-सांगलीसमोर पाणीटंचाईचे संकट

SCROLL FOR NEXT