Jalgaon highway  sakal
जळगाव

जळगाव महामार्गावरील अतिक्रमणाबाबत टोलवाटोलवी

मनपा म्हणते मदत करणार, कारवाईचे अधिकार नाही : न्हाई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील महामार्गालगत वाढत चाललेले अतिक्रमण काढण्याबाबत महापालिका प्रशासनाने महामार्ग प्राधिकरणास मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. तर, दुसरीकडे महामार्ग प्राधिकरणाने मात्र कारवाईचे अधिकार आम्हाला नाही, अशी भूमिका घेतली आहे.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा लोकवस्ती प्रचंड वाढली, त्यामुळे वाहनांची संख्या वाढून आवागमनाचा भार महामार्गावर आला. त्यामुळे या मार्गावरील अपघातही वाढल्याने समांतर रस्ते, महामार्ग चौपदरीकरणाची मागणी होऊ लागली.

अनेक वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होऊन खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतच्या सात किलोमीटर टप्प्यातील चौपदरीकरण पूर्ण झाले. मात्र, हे काम पूर्ण होऊनही महामार्गावर ठिकठिकाणी दोन्ही बाजूंनी वाढत चाललेले अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे. अग्रवाल हॉस्पिटलच्या चौकापासून पुढे शासकीय अभियांत्रिकी व विद्युत कॉलनीपर्यंत विविध वस्तू, फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या भागात दोन्ही बाजूंनी टपऱ्याही सुरू होत असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

यंत्रणांची उदासिनता

असे असताना ज्यांनी महामार्ग बांधला ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ज्यांच्या हद्दीत आहे ते मनपा प्रशासन व शहरातील रस्ते सुरक्षेची जबाबदारी असलेली पोलिसांची वाहतूक शाखा या तीनही यंत्रणा याबाबत कमालीच्या उदासीन आहेत.

‘सकाळ’चा पाठपुरावा

‘सकाळ’ने महामार्ग कामाबरोबरच आता तो पूर्ण झाल्यानंतर त्यातील त्रुटी व रस्त्यालगच्या अतिक्रमणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. अतिक्रमणाचा विषय शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर यंत्रणांनी आपापली भूमिका ‘सकाळ’कडे मांडली.

''महामार्गावरील अथवा त्या लगतच्या जागेवर अतिक्रमण होत असेल तर ती जागा महामार्ग प्राधिकरणाची असल्याने ते अतिक्रमण काढण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्यांना यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची, यंत्रणा पुरविण्याची महापालिकेची तयारी आहे.''

- श्‍यामकांत गोसावी, उपायुक्त, मनपा

''महामार्ग जळगाव शहरातून मार्गस्थ होत आहे. शिवाय चौपदरीकरणात मूळ महामार्ग जळगाव शहराला वळसा (बायपास) घालून गेला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून आम्ही शहरातील महामार्ग विकसित करून दिला आहे. तो शहराच्या हद्दीत असल्याने त्या महामार्गाच्या बाजूने होत असलेले अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मात्र त्यावरील कारवाईचे अधिकार आम्हाला नाहीत. त्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणेनेच पुढाकार घेतला पाहिजे.''

- सी. एम. सिन्हा, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT