Police Arrested esakal
जळगाव

Jalgaon News : सरंपचाच्या ट्रॅक्टरची बॅटरी लंपास; चोरट्यांवर संशय व्यक्त करताच तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भादली (ता. जळगाव) शिवारातील शेतात पत्र्याचे शेडचे कुलूप तोडून चोरट्यांनी ट्रॅक्टरची ७ हजार रुपयांची बॅटरी चोरून नेली. सरपंचाच्या खळ्यातच चोरट्यांनी हात मारला. नशिराबाद पोलिसांनी काही तासांत संशयितांना अटक केली.

भादलीचे सरपंच व शेतकरी मिलिंद दत्तात्रय चौधरी (वय ४०) यांची भादली शिवारात (गट क्रमांक ५८३) शेतजमीन आहे. त्यांनी साहित्य ठेवण्यासाठी शेतात शेड केले असून, त्याठिकाणी ट्रॅक्टर उभे करतात. शनिवारी (ता. १४) मिलिंद चौधरी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतात गेले असता, त्यांना शेतातील शेडचे कुलूप तुटलेले दिसले. (Battery of Sarpanch tractor is dead Three people arrested as they suspected thieves Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

शेडमध्ये उभे केलेले ट्रॅक्टर (एमएच १९, सीएस ८४५९)मधील बॅटरी चोरून नेल्याचे आढळून आले. मिलिंद चौधरी यांनी तत्काळ नशिराबाद पोलिसांत तक्रार दिली. सरपंचांनी आसोदा येथील कैलास पांडुरंग सपकाळे (वय २६) याच्यावर संशय व्यक्त केला होता.

नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलियार खान, रवी तायडे, नूर पठाण, किरण बाविस्कय यांनी तरसोद रोडवरून ट्रीपलसीट दुचाकीवरून पळणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत पोलिसांनी तिघांवर झडप घातली.

त्यात कैलास पांडुरंग सपकाळे, सुनील पांडुरंग चौधरी (वय ३०) आणि राहुल रमेश शेळके (वय २२, तिघे रा. ढंढोरेनगर, तरसोद, ता. असोदा) यांना पकडण्यात यश आले. संशयितांकडून सात हजारांची नवी कोरी बॅटरी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. सहाय्यक फौजदार अलीयार खान तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir Angry: तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, २३ वर्षाच्या पोराला...! गंभीर भडकला; म्हणाला, त्याचा बाप माजी चेअरमन नाही, म्हणून...

Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

पुण्यात PMPL बसची दुचाकीला मागून धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT