gang rape news
gang rape news esakal
जळगाव

Jalgaon : गर्भवती आदिवासी तरुणीवर पाशवी अत्याचार?

सकाळ वृत्तसेवा

तोंडापूर/ जळगाव : जामनेर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या अठरावर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार करून तिला गंभीर जखमी अवस्थेत सोडून संशयितांनी पळ काढल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी या पीडितेला तातडीने जळगाव जिल्‍हा रुग्णालय आणले. तेथून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि तेथून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पीडितेवर अत्याचार करून तिला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी घटना उजेडात आल्यापासून पीडितेच्या गरीब कुटुंबीयांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न होत आहे. (Brutal abuse of pregnant tribal girl case Jalgaon crime Latest Marathi News)

पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अठरा वर्षीय विवाहिता शुक्रवारी (ता.२) सार्वजनिक शौचालयात गेली होती. जेठाणी-देराणी सोबत गेल्या असताना पाऊस सुरू झाल्याने जेठाणी घराकडे निघून आली. देराणी घरी गेली असावी म्हणून जेठाणी घरी पोहचली तर तेथेही ती नसल्याने शोधाशोध सुरू झाली.

जोरदार पाऊस सुरू असताना ती शौचालयामागील जागी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांना काही कळण्याच्या आतच तिला तातडीने जळगावला उपचारार्थ आणण्यात आले. येथे प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत तिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव खुर्द येथे हलविण्यात आले.

मात्र, तेथेही काही उपचार होऊ न शकल्याने तिला औरंगाबादला हलविण्यात आले असून, अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या पीडितेवर अत्याचार तर झालाच आहे. मात्र, तिच्या सोबत अमानवीय कृत्य केल्याची पुष्टी डॉक्टरांनी केल्याचे घाटी रुग्णालयाच्या सुत्रांनी माहिती देताना सांगितले.

पीडित कुटुंबावर दबाव

पीडितेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी सुरवातील शस्त्राने वार झाल्याचे सांगितले, नंतर अवस्था भयावह असल्याने त्यांना रानडुकराने किंवा पशुने हल्ला केल्याचा जबाब देण्यास सांगण्यात आले.

आपल्या कुटुंबीयांवर काय प्रसंग ओढवला आहे, तिचा जीव वाचवणे महत्त्वाचे असताना गरीब अशिक्षीत या कुटुंबाला कोणाला काय, सांगायचे काय सांगू नये, यासाठी दबाव आणला जात असल्याचे आढळून आले आहे.

पोटातच बाळाचा मृत्यू

पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असताना नराधमांनी तिचे लचके तर तोडलेच, मात्र तिच्यावर जो अमानविय अत्याचार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला आहे. पीडिता शुद्धीवर आल्यानंतरच या प्रकरणात नेमकी काय घटना घडली आहे, याचा सोक्षमोक्ष लागणार असून, ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, गावात शांतता ठेवावी, असे आवाहन पहूर पेालिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT