Crime
Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पतीकडून 5 लाखांसाठी छळ विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेने माहेरून पाच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना रविवारी (ता.११) उघडकीस आली. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विवेकानंद नगरातील माहेर असलेल्या नंदा विलास पाटील यांचे अमळनेर येथील विलास अशोक पाटील यांच्यासोबत विवाह झाला आहे. (case has been filed on complaint of harassment by husband for 5 lakhs jalgaon crime news)

विवाहानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या पतीने घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपयांची मागणी केली.

परंतु विवाहितेने त्यांची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करीत मारहाण करण्यात आली. विवाहितेस माहेरी पाठवून दिले.

वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पती विलास अशोक पाटील, जेठ कृष्णराव पाटील, जेठानी सुवर्णा पाटील (दोघे रा. पुणे), नणंद आरती पवार.

नंदोई सूर्यकांत पवार (दोघे रा. पिंपरी चिंचवड), चुलत जेठानी अलका दिलीप पाटील (रा. अमळनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार प्रशांत पाठक तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT