Retired Civil Engineering Assistant Action Committee office bearer half-naked movement esakal
जळगाव

Jalgaon News : आंदोलनांनी गजबजले जिल्हाधिकारी कार्यालय; अर्धनग्न आंदोलनाने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विविध मागण्यांसाठी विविध पाच संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. २४) आंदोलन (Movement) केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरो, बहुजन मुक्ती पक्षाने ‘बजेट’ची होळी

केली, तर सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करून लक्ष वेधले. (Collectors office was crowded with agitation Jail Bharo Budget Holi semi naked movement attracted attention jalgaon news)

केंद्र शासनाने सादर केलेले ‘बजेट’ देशातील सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करणारे आहे. बजेटमध्ये शैक्षणिक, आरोग्य, शेती, ग्रामविकास, प्रधानमंत्री फसल योजना, मनरेगा योजना, अल्पसंख्याक कार्यालय, अशा मंत्रालयीन खात्यांमध्ये बजेटमध्ये भरीव तरतूद नाही,

असा आरोप करीत बहुजन मुक्ती पक्षाच्या जिल्हा शाखेतर्फे ‘बजेट’ जलाओ आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजू खरे, युवा जिल्हाध्यक्ष विनोद अडकमोल, कार्याध्यक्ष विजय सुरवाडे, अमजद रंगरेज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक

नागरी सेवा ( वेतन) नियम १९८१ मधील तरतुदीनुसार सर्व १३ संवर्ग कर्मचाऱ्यांचे पदानामांतर करून समकक्ष स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर १ जानेवारी १९८९ ला समाविष्ट करणे व नियम ४० नुसार वेतन निश्‍चित करावे, १ आक्टोबर १९९४ ला कालबद्ध पदोन्नतींतर्गत पहिला लाभ पदोन्नती साखळीतील वरिष्ठ श्रेणीचा लाभ वित्त शासन शुद्धीपत्रक १ फेब्रुवारी २०२० नुसार अनुज्ञेय करावा.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

कास्ट्राइब कर्मचारी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करताना पदाधिकारी दुसऱ्या छायाचित्रात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे बजेटविरोधात आंदोलन करताना पदाधिकारी.

१ ऑक्टोबर २००६ ला आश्‍वासीत प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ अनुज्ञेय करावा, वित्त विभाग शुद्धीपत्रक वेतन १११०/प्र.क्र.८/२०१० सेवा-३ नुसार १ ऑक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत देण्यात आलेल्या काल्पनीक वेतनवाढीचा फरक रोखीने अदा करावा यासह

विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीच्या (सार्वजनिक बांधकाम) जळगाव शाखेतर्फे अर्धनग्न मूक आंदोलन करण्यात आल्याची माहिती समितीचे सचिव दशरथ निकम यांनी दिली. आंदोलनात सर्व पदाधिकारी व सदस्यांनी भाग घेतला.

अंगणवाडीसेविकांचे जेलभरो

अंगणवाडीसेविकांनी विविध मागण्यांसाठी राज्यभर गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. त्याची अद्यापही राज्य शासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) च्या जळगाव शाखेतर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले.

आयटक संघटनेतर्फे विविध मागण्यांबाबत आंदोलन करताना अंगणवाडीसेविका. दुसऱ्या छायाचित्रात विविध मागण्यांबाबत धरणे आंदोलन करताना बीएसएनएलचे कर्मचारी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ सेवानिवृत्ती लाभ कोशन ट्रॅकर मराठी करणे, नवीन दर्जेदार मोबाईल देण्याबाबत आश्‍वासन भंग केल्याने २० फेब्रुवारीपासून राज्यातील सव्वादोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. शासन याबाबत बेफकीर आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत विचार झालेला नाही.

अत्यल्प मानधनामुळे अंगणवाडी कमचाऱ्यांचे हाल होत आहेत. अंगणवाडीसेविका, मदतनिसांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा २८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमृतराव महाजन, प्रेमलता पाटील, ज्योती पाटील, साधना शार्दूल, मीनाक्षी काटोले, अश्‍विनी देशमुख, विजया बोरसे आदींनी आंदोलनात भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT