गांधीतीर्थची दशकपूर्ती
गांधीतीर्थची दशकपूर्ती sakal
जळगाव

जळगाव : वर्तमानात गांधी विचारांची अपरिहार्यता अधोरेखित

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वर्तमान परिस्थितीत गांधी विचारांची अपरिहार्यता आहे. मोठ्या भाऊंनी दूरदृष्टीने या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठीच गांधीतीर्थची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक दलूभाऊ जैन यांनी केले.

गांधीतीर्थच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या सुरवातीपासून कार्यरत असलेल्या २४ सहकाऱ्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार, संचालिका ज्योती जैन, सल्लागार डॉ. के. बी. पाटील, गांधी संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल व जैन फार्म फ्रेश फुड्स लि. चे संचालक अथांग जैन यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. के. बी. पाटील यांनी गांधीतीर्थच्या वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला. अशोक जैन यांनी कोरोना पश्चातच्या कालखंडात आपण अधिक जोमाने कार्य करीत मोठ्या भाऊंचे स्वप्न साकारण्यासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन केले. अथांग जैन यांनी समयोचित भाषण केले. गिरीश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

कृतज्ञता अन्‌ सन्मान

प्रमोद जैन, नीलेश पाटील, अनिलेश जगदाळे, तुषार बुंदे, विश्‍वजित पाटील, संतोष भिंताडे, प्रदीप मराठे, डॉ. अश्‍विन झाला, चंद्रशेखर पाटील, सुधीर पाटील, निवृत्ती वाघ, श्रीराम खलसे, नामदेव धनगर, अमोल भोलाणकर, राजेंद्र माळी, दगडू पाटील, नीलेश कोल्हे, सुभाष भंगाळे, अमोल पाटील, सविता महाकाळ, दुर्वास नलगे, सुरेश पाटील, अशोक चौधरी व उदय महाजन या सहकाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT