Solar Pannel (file photo)
Solar Pannel (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : पोस्टमन देणार 'सूर्यघर'; 33 हजारावर कुटुंबांना सूर्यघराचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना घरोघरी पोचविण्यासाठी आता टपाल खात्याची निवड केली आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक यांना घरोघरी जावून सर्वेक्षणाचे काम दिले आहे. ‘पीएम सूर्यघर अॅप’द्वारे इच्छूक लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

जिल्ह्यात एकूण पोस्टमन व ग्रामीण डाकसेवक असे एकूण ५५६ कर्मचारी आहेत. त्यांना प्रत्येकाला ६० घरांचा सर्वे करण्यास सांगीतले आहे. (Jalgaon central government is now using postage to deliver Prime Minister Surya Ghar free electricity scheme to every household)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यभर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे, देशभरात एक कोटी घरामध्ये ही योजना राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. घराच्या छतावर सौर उर्जा वीजनिर्मिती संच बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे. ही वीज फ्री वापरून विजेची गरज पूर्ण करायची, असे या योजनेचे स्वरूप आहे.

घराला लागणाऱ्या गरजेएवढी वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते. निर्माण झालेली अतिरिक्त वीज महावितरण विकत घेणार आहे. एका कुटुंबाला दोन किलो वॅटपर्यंत प्रत्येक किलोवॅटला ३० हजारांचे तर अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतमेची यंत्रणा बसविणाऱ्या कुटूंबाला एका किलोवॅट १८ हजारांचे असे जास्तीत जास्त ७८ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे.

ग्राहक सध्या वीज वापरत असलेल्या वीज वितरकांची माहिती, मागील सहा महिन्यातील कोणत्याही एका वीजबिलाचा फोटो अपलोड केला जात आहे. घराच्या छतावर किती क्षमतेचा सौर संच हा बसविता येवू शकतो याची नोंदणी केली जात आहे. (latest marathi news)

कुटुंब, संस्था या योजनेस पात्र ठरणार आहे. एक किलोवॅटसाठी आठ ते १० चौरस मीटर क्षेत्र सौरऊर्जा संच हा सुमारे २५ वर्षे चालतो. भाड्याच्या घरात, रिकाम्या जागेवरही उभारता येऊ शकते. स्थलांतरित केले जाऊ शकते.

एक किलो वॅटसाठी आठ ते १० चौरस मीटर क्षेत्र आवश्यक आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या एका दिवसात यात ते पाच युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. यंत्रणा बसविणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एका किलोवॅटला १८ हजाराचे असे ७८ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे.

"पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे. प्रत्येकाला मोबाईल दिलेले असून ऑनलाईन अॅपद्वारे सध्या नोंदणी सुरू आहे. जिल्हयात ३३ हजार ३६० कुटूंबाचे टार्गेट दिले आहे. आतापर्यंत १८ हजार नोंदणी झाली आहे. नोंदणीची मुदत वाढविण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे." -संदीप सोनवणे, कार्यालय सहाय्यक, डाक अधीक्षक, कार्यालय जळगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT