Police inspector Gajanan Padghan and team along with the seized bikes and arrested suspects
Police inspector Gajanan Padghan and team along with the seized bikes and arrested suspects esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळला टोळीकडून 12 दुचाकी जप्त; बाजारपेठसह गुन्हे शोध पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बारा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दुचाकी (एमएच १९, डीएन ४७०४) चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस कर्मचारी विजय नेरकर करीत असताना गुन्हे शोध पथकाला चोरीच्या एकूण बारा दुचाकी हस्तगत करण्यास यश आले आहे. (Jalgaon Crime 12 bike seized from three suspects in Bhusawal)

गुप्त बातमीच्या अनुषंगाने संशयित शेख बासीद शेख बाबू (वय, रा. सुलतानपुरा, जळगाव जामोद, ह. मु. मोहम्मदनगर भुसावळ), मोहम्मद आयज मोहम्मद एजाज (वय २५, रा. जळगाव जामोद, जि. बुलढाणा), रवींद्र अंबादास घोडसे (वय ४८, रा. पळसोडा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

तपास दरम्यान तिन्ही संशयितांनी भुसावळ, जळगाव जामोद, बऱ्हाणपूर येथून या दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्याची एकूण किंमत ४ लाख ६५ हजार रुपये आहे. या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक गजानन पडघन, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, यासिन पिंजारी, महेश चौधरी, समाधान पाटील, नीलेश चौधरी, रमण सुरळकर.

उमाकांत पाटील, दिनेश कापडणे, आदींनी केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असते दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी विजय नेरकर तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT