Nagpur Crime: पाठलाग करुन महिलकडे केली शरीरसुखाची मागणी, कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

पाठलाग करून महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal

Gondiya Crime Against Woman: पाठलाग करून महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय शनिवारी (ता. १६) दिला. नितीन देवराजपुरी मुलतानी (वय २५, रा. किन्ही, ता. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की, २१ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी नऊच्या सुमारास पीडित महिला ही गावाच्या बाहेर झुडपी जंगलात शौचास गेली होती. यावेळी आरोपी नितीन मुलतानीने तिच्या मागे मागे सायकलने जाऊन तिला शरीरसुखाची मागणी केली. पीडित महिलेने ही बाब तिच्या घरच्या लोकांना सांगितली व त्याच दिवशी रावणवाडी पोलिसांत आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली होती.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वानखेडे यांनी आरोपीविरूद्ध सरकारी पक्षाचा पुरावा व सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी नितीन मुलतानी यास दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

Nagpur Crime
Namaz on Road: 'असं का झालं...?' दिल्लीमधील नमाज प्रकरणी कोर्टाचे पोलिसांवर ताशेरे..मागवला घटनेचा पूर्ण अहवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com