Crime
Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मिरवणुकीतील वादातून एकावर चाकूहल्ला; किनगावात परस्परविरुद्ध गटांकडून 11 जणांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

यावल : किनगाव खुर्द (ता. १५) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकीत आपसात वाद झाले. यात मिरवणुकीतील वाहन पुढे नेण्यावरून तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात एका तरुणावर चाकूने पाठीवर हल्ला करण्यात आला तर दुसऱ्या गटाकडून एका गटाला जबर मारहाण झाली. (Jalgaon Crime Argument in procession stabs one)

या प्रकरणी परस्परांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. किनगाव खुर्द (ता. यावल) येथील शरद बाबूराव अडकमोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावात रविवारी (ता. १५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक सुरू होती. ही मिरवणूक किनगाव खुर्द ग्रामपंचायतीजवळ आली.

व मिरवणुकीचे वाहन पुढे नेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून शरद अडकमोल व त्यांची पत्नी मनीषा अडकमोल या दोघांना राहुल साळुंखे, सारंग साळुंखे, विजय मधुकर साळुंखे, योगेश दिलीप साळुंखे, बापू सीताराम साळुंखे, सिंधूबाई बापू साळुंखे व सोनी अमित सोनवणे या सात जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली.

तेव्हा यावल पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीश भोये, हवालदार नरेंद्र बागुले तपास करीत आहेत.

सारंग साळुंखे यांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार किनगाव खुर्द ग्रामपंचायतीजवळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून शरद अडकमोल, शीलवान अडकमोल, मनीषा अडकमोल व गणेश साळुंखे या चौघांनी राहुल साळुंखे याला शिवीगाळ करून मारहाण केली व त्याच्या पाठीवर चाकूने वार करून दुखापत केली. या चार जणांविरुद्ध सारंग साळुंखे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT