Assistant Superintendent of Police Abhaysingh Deshmukh, Sandeep Pardeshi, Vikas Shirole etc along with the suspected accused. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विवाहितेचा खून करून पुरावा नष्टचा प्रयत्न; वरखेडे येथील घटना

Jalgaon Crime : विवाहितेवर अत्याचार करून तिचा धारदार शस्त्राने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने महिलेचा मृतदेह गिरणा नदीपात्रातील वाळूमध्ये अर्धवट बुजविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे : विवाहितेवर अत्याचार करून तिचा धारदार शस्त्राने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने महिलेचा मृतदेह गिरणा नदीपात्रातील वाळूमध्ये अर्धवट बुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारेकऱ्याला येथील पोलिसांनी अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले. प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या संशयिताने खुनाची कबुली दिल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. (Jalgaon Crime Attempt to destroy evidence by killing married woman)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः वरखेडे खुर्द (ता. चाळीसगाव) येथील मायाबाई संजय मोरे (वय ३५) ही महिला आपल्या मुलासह मंगळवारी (ता. २) रात्री दहाला नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेली. मायाबाईंच्या सासऱ्यांना दवाखान्यात दाखल केल्याने तिचे पती गेले होते. बुधवारी (ता. ३) पहाटे चारला मायाबाईंचा मुलगा गौरव याला जाग आली असता त्याला घरात त्याची आई मायाबाई आढळून आली नाही.

त्यामुळे त्याने धावत जाऊन शेजारी राहणाऱ्या काकांना सांगितले. गौरवचे काका सर्जेराव मोरे व इतरांनी मायाबाईचा शोध सुरू केला. वरखेडे खुर्द शिवारात ज्ञानेश्वर शांताराम तिरमली यांच्या मक्याच्या शेतात शोध घेत असताना त्या ठिकाणी मक्याचे ताटे ठिकठिकाणी तुटलेले आढळले व त्याच ठिकाणी रक्त सांडलेले दिसले. काचेच्या तुटलेल्या बांगड्या मिळून आल्या. त्यामुळे काही तरी घातपात झाल्याचा कुटुंबीयांना संशय आला.

वाळूत पुरला मृतदेह

मायाबाईंचा शोध सुरू असताना सर्जेराव मोरे व काही जण गिरणा नदीपात्राकडे गेले असता, त्यांना नदीपात्रात वाळूचा ढिग दिसला. ज्यात मायाबाईंचा अर्धवट बुजलेला मृतदेह आढळला. ते पाहून सर्वच घाबरले व त्यांनी तत्काळ पोलिसपाटील संतोष तिरमली यांना ही माहिती दिली. घडलेला प्रकार गंभीर असल्याने मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, उपनिरीक्षक विकास शिरोळे. (latest marathi news)

श्री. घडवजे, गोपाल पाटील, मिलिंद शिंदे, गोरख चकोर, नितीन सोनवणे, प्रकाश कोळी, दीपक नरवाडे, सुदर्शन घुले, भूषण बाविस्कर, हनुमंत वाघोरे, संजय काळे, पोलिसपाटील तिरमली व राधेश्‍याम जगताप घटनास्थळी आले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला.

धारदार शस्त्राने खून

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मायाबाईंच्या डोक्यावर, दोन्ही कानांजवळ, छातीवर तसेच मांडीवर धारदार हत्याराने मारल्याच्या जखमा आढळून आल्या. कोणी तरी अज्ञात व्यक्तीने महिलेला धारदार शस्त्राने ठार केले व तिचा मृतदेह नदीपात्रात वाळूच्या ढिगाऱ्यात बुजवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या प्रकाराने पोलिस यंत्रणेसह गावकरीही हादरले.

तीन तासांत मुसक्या आवळल्या

पोलिसांनी तत्काळ तपासाच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. या दरम्यान, सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांना या खुनाच्या घटनेत सहभागी असलेल्या संशयिताची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी उपनिरीक्षक विकास शिरोळे, हवालदार गोरख चकोर, सुदर्शन घुले यांना संशयिताच्या शोधार्थ पाठविले. संशयित हा वरखेडे खुर्द भागाताच डोंगराळ भागात बकऱ्या चारत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने तेथे जाऊन त्याला पोलिस ठाण्यात आणल्यावर त्याला विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने खून केल्याची कबुली दिली. खून उघडकीस आल्यावर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी मारेकऱ्यास ताब्यात घेतले. संजय धोंडा गायकवाड (वय ३१, रा. वरखेडे खुर्द) असे संशयिताचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT