Assistant Police Inspector Bhausaheb Magre and staff of team along with arrested suspect and two wheeler.
Assistant Police Inspector Bhausaheb Magre and staff of team along with arrested suspect and two wheeler. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील लोहमार्ग पोलिस ठाणे पोलिसांनी दुचाकी चोरट्यास बोदवड रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तीन जणांच्या मुसक्या आवळून चोरीच्या बारा दुचाकी हस्तगत केल्या होत्या. त्यामुळे दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. (Jalgaon Crime Bhusawal police seized twelve stolen two wheelers after arresting three persons)

येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अजिमोद्दीन निजामोद्दीन शेख (वय ४६, रा. जामा मशिदीच्या मागे, शिरसोली, ता. जळगाव) यांनी त्यांच्या ओळखीचे कैलास मनोहर सपकाळे (रा. धामणगाव, ता.जि. जळगाव) यांना त्यांची दुचाकी सुमारे पाच महिन्यांपूर्वी वापरण्यास दिली होती.

दरम्यान, कैलास सपकाळे हे पाच फेब्रुवारील कामानिमित्त मलकापूर येथे जाण्यासाठी जळगाव रेल्वेस्थानकावर हिरो स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५, जीडब्ल्यू ८३६७) लावून जळगाव येथून रेल्वेने मलकापूर येथे निघून गेले. त्यांचे काम झाल्यावर ५ फेब्रुवारीला रात्री अकराला जळगाव येथे परत आले असता दुचाकी जागेवर आढळून आली नाही.

शोधाशोध करूनही दुचाकी दिसून आली नसल्याने अजिमोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी धनराज लुले, विशाल चौधरी, बाळासाहेब देवरे, बाबू मिर्झा तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक महेंद्र कुशवाह.

इमरान खान यांनी सीसीटिव्ही फुटेज व गोपनिय माहितीवरून संशयिताचा शोध घेतला कामराज मिठाराम गुरचळ (वय ५२, रा. आमदगाव, ता. बोदवड) यास रविवारी (ता.१७) बोदवड रेल्वेस्थानकाबाहेर ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून दुचाकी (एमएच १५, जीडब्ल्यू ८३६७) ही ३२ हजार २०० रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. या संशयिताकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिस तपास सुरू आहे. ही कामगिरी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

दुचाकी चोरट्यांची पाळेमुळे शोधणे गरजेचे

भुसावळ शहरासह परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलिस दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाने शनिवारी (ता. १६) तीन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बारा मोटारसायकली हस्तगत केल्या होत्या.

तपास दरम्यान तिन्ही संशयितांनी भुसावळ, जळगाव जामोद, बऱ्हाणपूर येथून या दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. आता लोहमार्ग पोलिसानी दुचाकी चोरीप्रकरणी संशयितास ताब्यात घेतले. त्यामुळे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, पोलिसांनी दुचाकी चोरीची पाळेमुळे शोधून काढणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT