Crime
Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : वनक्षेत्रात अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारा संशयास्पद इसम आढळून आल्यानंतर त्याची चौकशी करुन त्यास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मोहरला ते कोरपावली रस्त्याने वाहनचालक खलील रफिक तडवी रा. कोरपावली हा अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असल्याची माहिती वनविभागाच्या पथकास गस्त घालत असताना मिळाली. (Jalgaon crime case has been registered against illegal timber transporters)

वनविभागाच्या पथकाने या इसमा विरुध्द वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे.

उपवनसंरक्षक,यावल वनविभाग जळगाव यांच्यकडून मिळालेल्या गुप्त बातमी वरून मोहरला ते कोरपावली रस्त्याने वनपथक दबा धरुन बसले असताना एका ट्रॅक्टरमध्ये अंजन, निम इमारतीचे अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना नसल्याने वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे जमा केले.

पुढील कार्यवाही जखीर एम शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, प्रथमेश वि. हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे सहकारी करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT