Death
Death esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पोलिस कोठडीत संशयिताने उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चोरीच्या गुन्ह्यातील संशयित घनश्याम भाऊलाल कुमावत (वय ३५, डांगरी ता. अमळनेर) याने अमळनेर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आज शनिवारी (ता.९) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

डांगरी येथे बकरी चोरी प्रकरणात घनश्याम यास याआधीच अटक झाली होती. यानंतर त्याला डांगरी -करणखेडे शिवारात तार चोरी प्रकरणात अटक करण्यात आली. (Jalgaon Crime extreme step taken by suspect in police custody)

यात त्याला ९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअपची सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. आज शनिवारी सकाळी सहा ते सातच्या सुमारास तो शौचास गेला.

तिथे त्याने अंथरुणासाठी दिलेली शाल फाडून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ आरोपी बाहेर आला नाही म्हणून गार्डने चौकशी केली असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती कळताच उप अधिक्षक सुनील नंदवाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे, मारवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक घटनास्थळी पोहोचले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,एलसीबी चे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावला पाठविण्यात आले असून, न्यायवैद्यक पॅनल समोर शवविच्छेदन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT